‘व्हॅलेंटाईन वीक’मुळे शेतकऱ्यांचा फायदा

 ‘व्हॅलेंटाईन वीक’मुळे शेतकऱ्यांचा फायदा

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  फेब्रुवारी महिना हा तरुणांसाठीचा खास महिना असतो, कारण हा ‘प्रेमाचा महिना’ मानाला जातो. कारण प्रेमाचा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ याच महिन्यात असतो. 7 फेब्रुवारीपासून ‘व्हॅलेंटाईन वीक’ सुरू असतो. हा आठवडा प्रेमिकांना प्रेम व्यक्त करण्याची संधी देतो. आता प्रेमाचा महिना, प्रेमाचा दिवस म्हणजे प्रेमाचे एक प्रतिक गुलाब तर हवाच.व्हॅलेंटाईन वीकमुळे गुलाबाच्या फुलांना मोठी मागणी असते. सध्या मागणी वाढल्यामुळे गुलाबाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.Farmers benefit from ‘Valentine Week’

गुलाबाच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना बराच फायदा झाला आहे.

व्हॅलेंटाईन वीकमध्ये गुलाबाची फुले देण्याची प्रथा आहे. किंबहुना व्हॅलेंटाईन वीकची सुरुवातच ‘रोझ डे’ने होते. त्यामुळे गुलाबाला मागणीही या काळात वाढलेली आहे. त्यामुळे दरातही मोठी वाढ झाली आहे. गुलाबाची शेती ही शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा चांगला स्रोत आहे. फुलांची मागणी वाढल्याने त्याचा थेट फायदा फुलांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना होत आहे. देशातील विविध बाजारपेठांमध्ये गुलाबाच्या फुलांचे दर वाढले आहेत. सध्या 8 ते 10 रुपयांना विकले जाणारे गुलाबाचे फुल 40 ते 50 रुपयांना विकले जात आहेत. तर गुलाबाच्या पुष्पगुच्छाची किंमत हजारो रुपयांपर्यंत सांगण्यात येत आहे.

उत्तर प्रदेशच्या गाझीपूर बाजारपेठेत 70 टक्के फुलांची निर्यात बंगळुरू आणि नागपूरमधून होते. पांढऱ्या, पिवळ्या, फॅमिलिया, केशरी रंगाचे गुलाब तसेच जरबेराची फुलेही येथून गाझीपूर मंडीत येतात. उत्पन्नानुसार बाजारभाव ठरवला जात असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. फुलांचे उत्पादन जास्त आणि विक्री कमी असेल तर भाव खाली येतात.तर आवक कमी आणि मागणी वाढली की फुलांच्या दरातही वाढ होते. याचा शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, पुढचे काही दिवस फुलांचे दर तेजीत राहणार असल्याचा अंदाज अभ्यासकांनी वर्तवला आहे. त्यामुळं त्याचा फायदा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

ML/KA/PGB
9 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *