आरपीएफ जवानाने केली वरिष्ठाची हत्या

 आरपीएफ जवानाने केली वरिष्ठाची हत्या

कल्याण, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कल्याण आरपीएफच्या सब इंस्पेक्टरची आरपीएफच्या जवानाने हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण मध्ये घडली आहे. बसवराज गर्ग असे मयत सब इन्स्पेक्टरचे नाव असून पंकज यादव असे आरोपीचे नावे आहे .

दोन वर्षांपूर्वी पंकज यादव याचे एका प्रकरणात चौकशी करत त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती या कारवाईचा राग मनात धरून त्याने ही हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली .RPF jawan killed a senior

नेमके काय घडले

आरपीएफ मध्ये बसवराज गर्ग सब इन्स्पेक्टर पदावर कार्यरत होते.कल्याण पूर्वेकडील सिद्धार्थ नगर येथील रेल्वेच्या बॅरेक मध्ये ते राहत होते. काल रात्रीच्या सुमारास बसवराज हे आपल्या बॅरेक मध्ये मोबाईल वर गाणी ऐकत असताना त्या ठिकाणी अचानक आरपीएफ जवान पंकज यादव आला. त्याने हातातील लाकडी दांडक्याने व ठोशाबुक्क्यांनी बसवराज यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

या मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने बसवराज यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर पंकज यादवने त्या ठिकाणाहून पळ काढला व थेट पेण गाठले. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांना माहिती मिळताच याप्रकरणी पोलीस ठाण्यात पंकज यादव विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू करण्यात आला.

पंकज हा पेण येथे लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ पेण गाठत अवघ्या सहा तासात पंकजला बेड्या ठोकल्या.

दोन वर्षांपूर्वी आरपीएफ कार्यालयात पंकज याचे त्याच्या सहकार्याची वाद झाल्याने याबाबत वरिष्ठांना तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीच्या चौकशीनंतर वरिष्ठांनी पंकज वर कारवाई करत त्याची इन्क्रिमेंट थांबवली होती. या कारवाईचा राग पंकजच्या मनात होता दोन वर्षापासून तो संधीच्या शोधात होता अखेर काल त्याने बसवराज यांना गाठून त्यांची हत्या केल्याचे आता उघड झालं.

दरम्यान या चौकशी समिती मध्ये आणखी दोन जण सहभागी होते .त्यांच्या शोधात तो चिपळूणला जाणार होता मात्र याआधीच पोलिसांनी त्याला अटक केली .RPF jawan killed a senior

ML/KA/PGB
9 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *