खासदार नवनीत राणा यांचे वडील फरार घोषित

 खासदार नवनीत राणा यांचे वडील फरार घोषित

मुंबई , दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जात पडताळणी प्रकरणात अमरावती amravati लोकसभा मतदार संघाच्या खासदार नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंग कौर यांना शिवडी कोर्टाकडून फरार म्हणून घोषित करण्यात आलं आहे.तसेच नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांना 1 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे खासदार नवनीत राणा यांना मोठा धक्का बसला आहे.

सर्वोच्च न्यायालयात आणि मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेली प्रकरण दोन्ही वेगळी असल्याचं निरीक्षण शिवडी कोर्टाने नोंदवले आहे. महिन्याभरात कोर्टापुढे हजर न झाल्यास प्रॉपर्टी जप्त होण्याची शक्यता आहे. याप्रकरणात पुढील सुनावणी 16 फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

खासदार नवनवीत राणा यांच्यावर जात प्रमाणपत्रासाठी शाळा सोडल्याचा बनावट दाखला दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. नवनीत राणा यांचे वडिल हरभजन सिंग कौर यांनी फसवणूक करुन प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात 2014 साली तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ML/KA/PGB

30 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *