विदर्भात भरले झाडीबोली साहित्य संमेलन…
भंडारा, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठी भाषेप्रमाणे झाडीबोलीला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा तसेच मराठी भाषा समृद्ध करायची असेल तर बोली भाषा समृद्ध व्हावी या साठी हे दरवर्षी विदर्भात वेगवेगळ्या जिल्ह्यात साहित्य संमेलन भरविले जातात. यावर्षी ३० वे झाडीबोली साहित्य संमेलन हे भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील पिंडकेपार या गावात भरले आहे.
हे साहित्य संमेलन म्हणजे बौद्धिक मेजवानी असते. यातून साहित्यिकांना, नवकवींना प्रेरणा मिळते.
झाडीबोली साहित्य मंडळ, शारदा वाचनालय, सर्वांगीण शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील पिंडकेपार येथील कवी दयाराम चांदेवार गुरूजी साहित्य नगरीत आयोजित झाडीबोली साहित्य संमेलन होत असून संमेलनाध्यक्ष कवयत्री रंजना हलमारे होत्या.
दोन दिवसीय या संमेलनात प्रमुख पाहुणे झाडीबोलीचे अर्ध्वर्यू डाॅ. हरिश्चंद्र बोरकर, पद्मश्री डाॅ. परशुराम खुणे, माजी संमेलनाध्यक्ष डाॅ. मनोहर नरांजे, माजी आमदार डाॅ. हेमकृष्ण कापगते, बोली संशोधक हिरामन लांजे, सभापती सभापती गणेश आदे, स्वागताध्यक्ष अमोल हलमारे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम गावातील हनुमान मंदिरातून पुस्तक पोहा अर्थात ग्रंथ दिंडी काढण्यात आली. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर व वर्धा येथील झाडीबोली साहित्यिकांची मांदियाळी यात जमली होती. राम महाजन यांनी प्रस्तावनेतून झाडीबोली संमेलनांची परंपरा विस्तृतपणे मांडली. लोकराम शेंडे यांनी झाडी गौरव गीत गावून संमेलनात रंगत आणली.
झाडीबोली भाषेबाबतची
भूमिका डाॅ. हरिश्चंद्र बोरकर यांनी तर आदव्याची सुपारी स्वागताध्यक्ष अमोल हलमारे यांनी दिली. दुकोडा पालिकचंद बिसने यांनी सादर केला. पूर्वाध्यक्ष डाॅ. मनोहर नरांजे यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन कार्याध्यक्ष डाॅ. संजयकुमार निंबेकर यांनी तर आभार कुंजीराम गोंधळे यांनी मानले.
दोन दिवसांच्या कार्यक्रमांमध्ये दंडार, खडीगंमत, पोवाडे यासारख्या ग्रामीण भागातील कलेचे सादरीकरण करण्यात आले. तसेच विविध लेखकांच्या पुस्तकांचे प्रदर्शन सुद्धा या ठिकाणी लावण्यात आले होते.Zadiboli Literary Conference in Vidarbha…
केंद्रशासनाचा संगीत नाट्य अकादमीचा अमृत पुरस्कार विजेते झाडीबोली साहित्यिक डाॅ. हरिश्चंद्र बोरकर व पद्मश्री पुरस्कार विजेते झाडीपट्टी रंगकर्मी डाॅ.परशुराम खुणे, ज्येष्ठ समाजसेवक ॲड. सीताराम हलमारे, संत डोमा कापगते, डाॅ.संजयकुमार निंबेकर, ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक मारोतराव तरोणे, यांचे यावेळी सत्कार करण्यात आले.
झाडीबोली भाषा समृद्ध करण्यासाठी हे संमेलन आवश्यक असून अश्या संमेलनातून या भाषेतील लेखक, कवी, साहित्यिक समोर येतील आणि ही भाषा ही समृद्ध होईल असे मत समेलन अध्यक्ष यांनी व्यक्त केलं.
ML/KA/PGB
29 Jan. 2023