आजवर केवळ धनाढ्य लोकांना मिळालं ते आता सर्वसामान्य लोकांनाही मिळेल

 आजवर केवळ धनाढ्य लोकांना मिळालं ते आता सर्वसामान्य लोकांनाही मिळेल

मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आजवर केवळ धनाढ्य लोकांच्याच नशिबी असणाऱ्या सुविधा सर्वसामान्य जनतेला ही मिळावे यासाठी आम्ही काम करीत आहोत, वाहतूक आरोग्य,उद्योग , व्यापार आदी गोष्टी वर आम्ही वेगाने काम करीत आहोत ,भविष्यात मुंबईचा कायपलात होणार आहे असा विश्वास आज पंतप्रधान नरेन्द्र मोदी Prime Minister Narendra Modi यांनी मुंबईत दिला.

मुंबईतील मेट्रो आणि इतर प्रकल्पांचे लोकार्पण तसेच एस्टीपी प्लांट , रुग्णालय यांचे भूमिपूजन करण्यासाठी ते मुंबईत आले होते, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यपाल भगतसिंग कोशियारी , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, राज्यमंत्रीमंडळातील सदस्य , खासदार आणि आमदार यावेळी उपस्थित होते.

मुंबई तट्रान्स हार्बर लिंक , मेट्रो ,धारावी पुनर्विकास , नवी मुंबई विमानतळ ही त्यातीलच महत्त्वाची कामे आहेत , हे केवळ डबल इंजिन सरकारमुळे शक्य आहे, आम्हीं देशभरातील सर्व महत्त्वाच्या शहरांच्या विकासासाठी प्रयत्न करीत आहोत, कचऱ्याच्या समस्येवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उपाय शोधत आहोत असे पंतप्रधान म्हणाले.

आमच्याकडे राजकीय इच्छा शक्तीची उणीव बिलकुल नाही मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ही त्यासाठी समर्पित माणसांची आवश्यकता आहे त्यामुळे मुंबईतही अशा सत्ताधाऱ्यांची आवश्यकता आहे हे मुंबईकरांनी ध्यानात ठेवावे असे आवाहन मोदी यांनी केले.What was previously only available to the rich will now be available to the common man

मुंबई साठी येणारा विकासाचा पैसा भ्रष्टाचारात न जाता तो केवळ लोकांच्या कामाला यायला हवा. आम्ही विकासात राजकारण आणत नाही मात्र वेगळ्या विचारांचे सरकार आल्याने कामत अडथळे आणले गेले , कामे रखडली त्यासाठी विकासाला गती देणारी माणसे ओळखा असे नरेंद्र मोदी म्हणाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांनी कळ दाबून विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले , त्यानंतर गुंदवली ते मोगरा या स्थानका दरम्यान मेट्रो ने प्रवास ही केला.

ML/KA/PGB
19 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *