दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांचाच झाला विनयभंग

 दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांचाच झाला विनयभंग

नवी दिल्ली, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विविध घटना उघडकीस येत असताना आता खुद्द महिला आयोगाच्या अध्यक्षांनाच एका धक्कादायक अनुभवाला सामोरे जावे लागले आहे.  दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांचा एका अनोळखी व्यक्तीने विनयभंग केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याबाबत स्वत: स्वाती मालीवाल यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. गुरूवारी रात्री ३ वाजेच्या सुमारास एम्स रुग्णालयाजवळ ही घटना घडली.

“काल रात्री उशिरा मी दिल्लीतील महिला सुरक्षेच्या स्थितीची पाहणी करत होते. यावेळी एका कार चालकाने मद्यधुंद अवस्थेत माझा विनयभंग केला. जेव्हा मी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने माझा हात गाडीच्या खिडकीत बंद केला आणि मला फरपटत नेले. सुदैवाने मला कोणतीही इजा झाली नाही”, अशी माहिती स्वाती मालीवाल यांनी ट्वीट करत दिली. तसेच ”दिल्लीत महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असेल, तर सामान्यांच्या परिस्थिती काय असेल?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

SL/KA/SL

19 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *