गोवा-मुंबई हायवेवरील अपघातात 10 ठार …
माणगाव, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज पहाटे ०४.४५ वाजता गोवा मुंबई हायवेवर गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजे रेपोली येथे दोन वाहनांमध्ये समोरासमोर टक्कर होऊन 10जण ठार झाले आहेत.
लोटे एमआयडीसी येथून मुंबईकडे जाणारा ट्रक MH-43 /U/ 7119 व मुंबईकडून गुहागर कडे जाणाऱ्या इको गाडी MH- 48 BT8673 यांच्यामध्ये अपघात झाला आहे. अपघातामध्ये 5 पुरुष 3 महिला आणि एका लहान मुलगी, एक लहान मुलगा असे 10 जण मयत झाले आहेत. मयत इसम एकमेकांचे नातेवाईक असुन ते हेदवी, ता. गुहागर येथे चालले होते.
ML/KA/SL
19 Jan. 2023