मुक्ता टिळक यांना श्रध्दांजली वाहून विधानसभा तहकूब
नागपूर, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विधानसभेतील भाजपाच्या विद्यमान आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाबद्दल त्यांना आज सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली आणि कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.Assembly adjourned to pay tribute to Mukta Tilak
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोक प्रस्ताव सभागृहात मांडला , अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केलं आणि सभागृहाने स्तब्ध उभे राहून त्यांना आदरांजली वाहिली.
असाध्य आजाराने पीडित असताना ही त्यांनी पक्षादेश पालन करत राज्यसभा , विधान परिषद निवडणुकीत हजर राहून मतदान केलं याचा आवर्जून उल्लेख या दोघांनी केला.
मुक्ता टिळक यांच्या सामाजिक आणि राजकीय कारकीर्दीचा आढावा घेत दोघांनी ही त्यांना आदरांजली वाहिली, यानंतर सभागृह दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं.
ML/KA/PGB
23 Dec .2022