महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद: मविआचे धरणे आंदोलन

 महाराष्ट्र कर्नाटक सीमा वाद: मविआचे धरणे आंदोलन

कोल्हापूर, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क)  : महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावर महाविकास आघाडीच्या वतीनं आज कोल्हापुरात धरणं आंदोलन करण्यात आलं. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळावर महाविकास आघाडीच्या वतीनं हे धरणं आंदोलन करण्यात आलं.

या आंदोलनात माजी कामगार मंत्री हसन मुश्रीफ, माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, नेते तसंच महिला, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज मुंबई यांच्या वक्तव्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्या भाषणातून निषेध व्यक्त केला‌ तसंच भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावर आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली.संयुक्त महाराष्ट्राची मागणी या धरणं आंदोलनात करण्यात आली.

ML/KA/SL

10 Dec. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *