छत्रपतींची ब्रिटनमधील जगदंबा तलवार परत आणणार: मुनगंटीवारांची घोषणा

 छत्रपतींची ब्रिटनमधील जगदंबा तलवार परत आणणार: मुनगंटीवारांची घोषणा

मुंबई,दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  आज राज्यभर शिवप्रताप दिनानिमित्त कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक अतिशय महत्तपूर्ण घोषणा केली आहे. ब्रिटनच्या ताब्यात असलेली छत्रपती शिवरायांची जगदंबा तलवार परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून 2024 पर्यंत ही तलवार राज्यात परत आणणार असल्याचे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

भवानी आणि जगदंबा या छत्रपतींच्या महत्त्वाच्या तलवारी ब्रिटनच्या ताब्यात असणे हा मराठी मनामध्ये वर्षानुवर्षे रुतलेला सल आहे. करवीरच्या छत्रपतींच्या ताब्यात असलेली शिवरायांनी वापरलेली ही तलवार 1875 मध्ये  भारतावर वर्चंस्व असणाऱ्या इंग्लिश सत्तेने   ब्रिटनच्या प्रिन्सला दबावपूर्वक भेट देण्यास भाग पाडले होते. सध्या ही तलवार ब्रिटनच्या राणीच्या वैयक्तिक संग्रहालयात ठेवण्यात आली आहे.  आता हा सल दूर होणार असल्याने शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे  पंतप्रधान झाल्यानंतर महाराष्ट्र सरकार तलवार परत आणण्याबाबत बोलणी सुरू केली आहेत.

Chhatrapati’s Jagdamba sword from Britain will be brought back: Mungantiwar’s announcement

SL/KA/SL

10 Nov. 2022

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *