केंद्राने दिली साखर निर्यातीला मंजूरी
नवी दिल्ली, दि.७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील साखरेची किंमत स्थिर ठेवणे आणि साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती यांचा समतोल राखण्यासाठी 2022-23 च्या साखर हंगामात 60 लाख मेट्रिक टनापर्यंत साखर निर्यात करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. ऊस उत्पादनाच्या सुरुवातीच्या अंदाजांवर आधारित ही परवानगी देण्यात आली आहे.
डीजीएफटी म्हणजेच विदेशी व्यापार संचालनालयाने 31 ऑक्टोबर 2023पर्यंत प्रतिबंधित श्रेणीत असलेल्या साखर निर्यातीचा समावेश वाढवण्यासंबंधीची अधिसूचना याआधीच जारी केली आहे.
सरकारने, 2022-23च्या साखर निर्यात धोरणामध्ये, देशातील सर्व साखर कारखान्यांसाठी गेल्या तीन वर्षांतील सरासरी उत्पादन आणि गेल्या तीन वर्षांतील सरासरी साखर उत्पादनावर आधारित वस्तुनिष्ठ प्रणालीसह साखर कारखानानिहाय निर्यात कोटा जाहीर केला आहे.
केंद्र सरकारने 30 सप्टेंबर 2023पर्यंत घरगुती वापरासाठी सुमारे 275 लाख मेट्रिक टन (एमएलटी) साखर, इथेनॉल उत्पादनाकडे वळवण्यासाठी सुमारे 50 एमएलटी साखर आणि 30 सप्टेंबर 2023पर्यंत जवळपास 60 एमएलटी साखर उपलब्ध असली पाहिजे, याला प्राधान्य दिले आहे.
देशातील साखर कारखान्यांनी उत्पादित केलेल्यापैकी शिल्लक साखरेला निर्यातीसाठी परवानगी दिली जाईल.
साखर हंगाम 2021-22 दरम्यान भारताने 110 एलएमटी साखर निर्यात केली आणि जगातील दुसरा सर्वात मोठा साखर निर्यातदार देश बनला. देशाने साखर निर्यात करून सुमारे 40 हजार कोटी रुपयांचे परकीय चलनही कमावले.
SL/KA/SL
7 Nov.2022