त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ५१ हजार पणत्यांचा दीपोत्सव   

 त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ५१ हजार पणत्यांचा दीपोत्सव   

पुणे, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आकर्षक रंगातील पणत्यांसह हजारो दिव्यांची आरास, विविध रंगातील फुलांची सजावट अशा मंगलमय, धार्मिक वातावरणासह फुलांच्या रंगावलीतून विश्वशांतीचा संदेश देणारी सामाजिक जोड यामुळे सारसबागेजवळील महालक्ष्मी मंदिरातील वातावरण भारावून गेले होते.Deep festival of 51 thousand grands on the occasion of Tripurari Poornima

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ५१ हजार पणत्यांचा दीपोत्सव मंदिरामध्ये करण्यात आला. श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट, श्री महालक्ष्मी मंदिर Shree Mahalakshmi Temple सारसबागतर्फे  या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, प्रविण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल यांसह विश्वस्त, पदाधिकारी व भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.

देवीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या महिला विविधरंगी वेशभूषेत दीपोत्सवात सहभागी झाल्या होत्या़ सुगंधी फुलांच्या मध्यभागी विश्वशांतीचा संदेश फुलांमधूनच साकारला होता़ तर, रंगीबेरंगी पणत्यांच्या प्रकाशात संपूर्ण मंदिर उजळून निघाले होते.

भारतासह जगभरात शांतता नांदावी, याकरिता विश्वशांतीचा संदेश देणारी रंगावली साकारण्यात आली होती. तसेच दीपोत्सवाच्या माध्यमातून संपूर्ण जग सुख-समृद्धधीने उजळून निघू दे, अशी प्रार्थना देवीचरणी करण्यात आली.

ML/KA/PGB
7 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *