शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे दिल्ली-नोएडा सीमा बंद, वाहनांच्या लांबच लांब रांगा
नवी दिल्ली, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नोएडामध्ये शेतकरी त्यांच्या मागण्यांसाठी नोएडा प्राधिकरणाच्या सीईओ रितू माहेश्वरी यांच्या घरावर मोर्चा काढणार आहेत. शेतकऱ्यांच्या विरोधामुळे दिल्लीहून नोएडाकडे येणाऱ्या रस्त्यावर वाहतूक वळवण्यात आली आहे. दिल्लीकडे जाणारा रस्ताही बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांचे प्रचंड हाल होत आहेत.
चिल्ला सीमेवर रस्ता बंद झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. शेतकर्यांच्या विरोधामुळे सेक्टर 1 फेरीजवळील वाहतूक बंद करावी लागली. रस्ता बंद केल्याने वाहनचालक तासन्तास जाममध्ये अडकले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलक चिल्ला सीमेवर शेतकरी रस्त्यावर ठाण मांडून बसले आहेत. आंदोलकांमध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
गेल्या काही महिन्यांपासून नोएडा प्राधिकरणाजवळील एका उद्यानात शेतकरी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. अनेकवेळा त्यांनी नोएडा प्राधिकरणाच्या गेटबाहेर ठिय्या आंदोलनही केले आहे. या क्रमाने, शेतकऱ्यांना सेक्टर 14 मधील नोएडा प्राधिकरणाच्या सीईओ रितू माहेश्वरी यांच्या घरी जाऊन धरणे द्यायचे आहे. मात्र पोलीस त्यांना तिथे जाण्यापासून रोखत आहेत. त्यामुळे सेक्टर १०च्या फेरीजवळील वाहतूक थांबवावी लागली. त्यामुळे दिल्लीहून नोएडा आणि नोएडाहून दिल्लीला जाणाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
HSR/KA/HSR/16 DEC 2021