अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर चांगली बातमी
नवी दिल्ली, दि.13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अर्थव्यवस्थेच्या (economy) आघाडीवर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) भारतासाठी एक चांगली बातमी आली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने या वर्षी विकास दर (growth rate) 9.5 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्याचबरोबर पुढील वर्षी म्हणजेच 2022 मध्ये विकास दर 8.5 टक्के दराने वाढू शकतो. कोरोनामुळे 2020-21 या आर्थिक वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेत 7.3 टक्के घट झाली होती.
जागतिक विकास दर सहा टक्क्यांपेक्षा कमी
The global growth rate is less than six percent
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) ताज्या जागतिक आर्थिक परिस्थिती (डब्ल्यूईओ) मध्ये भारताच्या विकास दराचा (growth rate) अंदाज यावर्षी जुलैमध्ये जारी केलेल्या मागील अंदाजावरच स्थिर ठेवला आहे, मात्र तो एप्रिलच्या अंदाजापेक्षा 1.6 टक्के कमी आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीपूर्वी जाहीर झालेल्या ताज्या डब्ल्यूईओ नुसार संपूर्ण जगाचा विकास दर 2021 मध्ये 5.9 टक्के आणि 2022 मध्ये 4.9 टक्के राहण्याचा अंदाज आहे.
अर्थव्यवस्था (economy) पुन्हा रुळावर आणण्यासाठी सरकारकडूनही प्रयत्न सुरू आहेत. एनएसओ च्या ताज्या आकडेवारीनुसार, देशातील औद्योगिक उत्पादन सातत्याने वाढले आहे आणि ऑगस्ट 2021 मध्ये ते 11.9 टक्के वाढले आहे. या व्यतिरिक्त, कच्चे तेल, कोळसा आणि पोलादासह 8 मूलभूत क्षेत्रातील उद्योगांच्या उत्पादनात वाढ झाली आहे.
कोरोना साथीमुळे गेल्या वर्षी मार्चपासून औद्योगिक उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यावेळी ते 18.7 टक्क्यांनी घसरले होते. एप्रिल 2020 मध्ये औद्योगिक उत्पादन 57.3 टक्क्यांनी कमी झाले कारण टाळेबंदीमुळे औद्योगिक उपक्रमांवर परिणाम झाला होता.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा चीनला मोठा धक्का
big blow to China From IMF
दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) चीनला मोठा धक्का दिला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार, चीनचा विकास दर (growth rate) 2021 आणि 2022 मध्ये कमी रहाणार आहे. चीनची अर्थव्यवस्था (economy) 2021 मध्ये आठ टक्के आणि 2022 मध्ये 5.6 टक्के दराने वाढू शकते. कॉर्पोरेट थकबाकीदारांच्या वाढत्या संख्येव्यतिरिक्त, मालमत्ता क्षेत्र हे याला कारणीभूत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी सांगितले की, त्यांच्या जुलैच्या अंदाजाच्या तुलनेत 2021 साठी जागतिक विकास दराचा अंदाज किरकोळ सुधारून 5.9 टक्के करण्यात आला आहे आणि 2022 साठी तो 4.9 टक्के राहील.
There is good news for India from the International Monetary Fund (IMF) at the forefront of the economy. The International Monetary Fund has projected a growth rate of 9.5 percent this year. At the same time, next year, in 2022, the growth rate may increase to 8.5 percent. Corona caused the country’s economy to shrink by 7.3 per cent in the 2020-21 financial year.
PL/KA/PL/13 OCT 2021