जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन

 जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन

मुंबई, दि. २५ : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आतापर्यंत अंशतः ऑनलाईन पद्धतीने चालणारी ही प्रक्रिया आता 100 टक्के ऑनलाईन करण्यात आली आहे. या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय (GR) सामाजिक न्याय विभागाकडून जारी करण्यात आला आहे. Offline अर्ज प्रक्रिया पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

  • जात पडताळणीसाठी अर्जदारांना आता केवळ ऑनलाईन प्रणालीद्वारेच अर्ज सादर करावा लागणार आहे. जात पडताळणी समितीच्या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन जमा केलेले ऑफलाईन अर्ज आता स्वीकारले जाणार नाहीत आणि ते ग्राह्यही धरले जाणार नाहीत.
  • जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी करावयाचा अर्ज फक्त ऑनलाइन प्रणालीमधूनच दाखल करता येईल. अन्य मार्गाने केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही अथवा ग्राह्य धरला जाणार नाही.
  • अर्जासोबत सादर करावयाची सर्व कागदपत्रे, दस्तऐवजी पुरावे व शपथपत्रे हीदेखील ऑनलाइन प्रणालीमध्ये सादर केली जातील. अर्जदारांनी संबंधित कागदपत्रे व शपथपत्रांच्या मूळ प्रती (Original)/प्रमाणित प्रती (Certified) स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक राहील.
  • अर्जासोबत जोडावी लागणारी सर्व आवश्यक मूळ पुरावे व कागदपत्रे ऑनलाईन प्रणालीवरच अपलोड करावी लागतील. कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन कागदपत्रांची ‘हार्ड कॉपी’ जमा करण्याची अट आता रद्द करण्यात आली आहे.
  • जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयाचे वारंवार चक्कर मारण्याची गरज पडणार नाही. ऑनलाईन प्रणालीमुळे अर्जाची सद्यस्थिती (Status) अर्जदाराला स्वतःच्या मोबाईलवर सहजरीत्या ट्रॅक करता येईल.
  • प्रक्रिया पूर्ण डिजिटल झाल्यामुळे मध्यस्थ व दलालांची मध्यस्थी संपुष्टात येईल.

SL/ML/SL

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *