नागरिकांशी संवाद साधत खासदार संजय दिना पाटील यांनी जागेवरच सोडविल्या अनेक समस्या

 नागरिकांशी संवाद साधत खासदार संजय दिना पाटील यांनी जागेवरच सोडविल्या अनेक समस्या

मुंबई, दि. २५ – ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी काल भांडुप येथील आपल्या जनसंपर्क कार्यालयात नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी थेट संवाद साधला. यावेळी आपल्या विविध समस्या आणि अडचणी मांडण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली होती. खासदार संजय दिना पाटील यांनी प्रत्येक नागरिकाचे म्हणणे जाणून घेत त्यांच्या समस्या समजून घेतल्या. यातील अनेक प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करत काही समस्या जागेवरच सोडविण्यात आल्या. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करत खासदार संजय दिना पाटील यांचे आभार मानले.

नागरिकांनी मांडलेल्या काही समस्या या संबंधित शासकीय विभागांचे अधिकारी, प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांच्या माध्यमातून सोडविणे आवश्यक असल्याने अशा प्रश्नांबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तसेच आवश्यकतेनुसार पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्यात येईल. नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नाला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असून, प्रलंबित समस्या मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असे खासदार संजय दिना पाटील यांनी यावेळी सांगितले. नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी अशा प्रकारचे जनसंवाद यापुढेही नियमितपणे आयोजित करण्यात येतील. नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील थेट संवाद अधिक दृढ करून सर्वसामान्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यावर भर दिला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, कामगार नेते तसेच खासदार संजय दिना पाटील यांचे वडील दिवंगत दिना बामा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी भांडुप येथील कार्यालयाला भेट दिली.

यावेळी त्यांनी दिना बामा पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *