अमेरिकन गुप्तचर संस्थेच्या सिस्टमवर सायबर हल्ला

 अमेरिकन गुप्तचर संस्थेच्या सिस्टमवर सायबर हल्ला

वॉशिग्टन डीसी, दि. २५ : जगातील सर्वांत बलाढ्य आणि तांत्रिकदृष्ट्या अद्ययावत असलेल्या अमेरिकेच्या गुप्तचर संस्था CIA आणि ODNI यांच्या संगणक प्रणालीवर सायबर हल्ला झाला आहे. हॅकर्सनी सार्वजनिक स्रोतांकडून गुप्तचर माहिती गोळा करून तिचे विश्लेषण करणाऱ्या प्रणालीत घुसखोरी केली. या प्रणालीमध्ये सोशल मीडिया, इंटरनेट, उपग्रह छायाचित्रे आणि खासगी डेटा कंपन्यांकडून मिळणाऱ्या माहितीचे विश्लेषण केले जाते. सध्या या हल्ल्यामागे कोणाचा हात होता आणि किती डेटा प्रभावित झाला, याची माहिती मिळालेली नाही. अधिकाऱ्यांच्या मते, प्रणालीतील बिघाड दुरुस्त करण्यात आला असून कोणतीही गोपनीय माहिती प्रभावित झालेली नाही. अमेरिकेत 12 ते 17 नोव्हेंबरदरम्यान अनेक सरकारी संस्था आणि कंपन्यांच्या प्रणालींमध्ये बिघाड झाले. यामुळे बँकिंग, विमानसेवा, हॉटेल बुकिंग आणि ऑनलाइन सेवा प्रभावित झाल्या.

गेल्या आठवड्यात नॅशनल सिक्युरिटी एजन्सी (NSA) चे गोपनीय नेटवर्कही काही काळासाठी बंद पडले होते. त्याचवेळी, FBI च्या राष्ट्रीय गुन्हेगारी माहिती डेटाबेसमध्ये घुसखोरी झाल्याप्रकरणी तपास सुरू आहे. मात्र, ट्रम्प प्रशासनाने या घटनांमागे एखाद्या संघटित सायबर हल्ल्याची शक्यता फेटाळून लावली आहे. राष्ट्रीय गुप्तचर संचालकांच्या मते, हॅकर्स आता AI च्या मदतीने सॉफ्टवेअरमधील त्रुटी वेगाने शोधत आहेत. याचा सामना करण्यासाठी सरकारी यंत्रणांना सातत्याने अपडेट आणि सुरक्षा पॅचची गरज भासत आहे.

मायक्रोसॉफ्टच्या डिजिटल डिफेन्स रिपोर्ट 2026 नुसार, जगातील टॉप-7 सायबर हल्ल्यांनी प्रभावित देशांमध्ये अमेरिका अव्वल स्थानावर आहे. तर भारत सातव्या क्रमांकावर आहे. जगभरात ट्रॅक केलेल्या सायबर धोक्यांमध्ये भारताचा वाटा 2.5% राहिला.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *