निदा खानला आश्रय देणाऱ्या नगरसेवकाच्या घर , कार्यालयावर महानगरपालिकेची कारवाई
छ संभाजीनगर दि १३ : नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय देणाऱ्या नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरावर महानगरपालिकेने बुलडोझर फिरवला आहे.
नाशिकच्या टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान ही एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरात आश्रित होती, त्यामुळे मतीन पटेल यांना पोलिसांनी या प्रकरणात आरोपी केले आहे. परिणामी मतीन पटेल यांना छत्रपती संभाजीनगर महापालिकेने दणका दिला.
त्यांच्या घरावर आता बुलडोझर कारवाई करण्यात येत आहे. ज्या घरात निदा खान लपलेली होती ते घर बेकायदेशीर अतिक्रमण करून बांधल्याचा ठपका ठेवत हे तोडकाम करण्यात येत आहे. एकूणच निदा खान ला आश्रय देणं एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांना भोवलं असून मतीन पटेल यांचे नगरसेवक पदही यामुळे धोक्यात आले आहे.ML/ML/MS