बारामतीत पुन्हा विमान कोसळलं, वैमानिक सुरक्षित …
पुणे दि १३ _ बारामतीत पुन्हा एकदा शिकाऊ विमानाचा अपघात झालेला आहे.अर्ध्या तासापूर्वी हे विमान पडले
आहे. बारामती तालुक्यातील गोजुबावी परिसरात या शिकाऊ विमानाला अपघात झाला आहे.हा अपघात कशामुळे झाला याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
रेड बर्ड कंपनीचे हे विमान असून गोजबाबी गावाच्या हद्दीत ते पडलेल आहे. यातील वैमानिक सुरक्षित असल्याची माहिती आहे. याच गावात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला होता. यापूर्वी देखील रेडबर्ड या कंपनीची विमाना या ठिकाणी कोसळलेली आहे. या ठिकाणी शिकाऊ वैमानिकांना प्रशिक्षण दिलं जातं. कारवार एव्हिशन आणि रेड बर्ड या दोन संस्था बारामती मध्ये वैमानिक प्रशिक्षण देतात. यापूर्वी देखील रेडबर्ड कंपनीवरती बंदी घालण्यात आली होती.ML/ML/MS