उल्हासनगर महापौर आपल्या भेटीला या उपक्रमाला सुरुवात
उल्हासनगर, दि ८
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या महापौर आपल्या भेटीला या उपक्रमाला उल्हासनगरातील पॅनल क्रमांक एक मधून सुरुवात करण्यात आली आहे, पहिल्याच उपक्रमात जवळपास १४ नागरिकांनी आपल्या विविध समस्या महापौरांकडे मांडल्या.
उल्हासनगर शहरातील प्रत्येक प्रभागांमध्ये जाऊन नागरिकांच्या थेट समस्या ऐकण्यासाठी महापौर आपल्या भेटीला हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाची प्रत्यक्ष पॅनल क्रमांक -१ मधून सुरुवात करण्यात आली आहे. महापौर आश्विनी निकम यांनी पॅनल क्रमांक -१ मध्ये गुरुवारी जाऊन नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या. या पहिल्याच उपक्रमात एकूण १४ नागरिकांनी आपल्या विविध समस्या महापौरांकडे मांडल्या त्यामध्ये शहर विकास आराखड्यानुसार रस्त्याचे रुंदीकरण, परिसरातील अस्वच्छता तसेच इतर मूलभूत सुविधांची संबंधित प्रश्नांचा समावेश होता.
महत्त्वाचे म्हणजे या भेटीदरम्यान महापालिकेचे संबंधित अधिकारी देखील उपस्थित असल्याने तक्रारींवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश महापौर आश्विनी निकम यांनी दिले. त्यामुळे नागरिकांच्या समस्या जलद गतीने मार्गी लागतील असा विश्वास आज व्यक्त करण्यात आला. यावेळी पॅनल क्रमांक एकचे नगरसेवक दिलीप गायकवाड, पूजा भोईर महापालिकेचे अधिकारी तसे शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .दरम्यान महापौर आपल्या भेटीला हा उपक्रम दर सोमवार आणि गुरुवारी राबवण्यात येणार असून नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यावर त्वरित तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हा उपक्रम खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असून प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.KK/ML/MS