एल आय सीमध्ये प्रथम श्रेणी अधिकारी नोकरभरतीत मराठी उमेदवारांना नाकारल्याबाबत शिवसेनेने (उबाठा) केले आंदोलन

 एल आय सीमध्ये प्रथम श्रेणी अधिकारी नोकरभरतीत मराठी उमेदवारांना नाकारल्याबाबत शिवसेनेने (उबाठा) केले आंदोलन

मुंबई, दि ५
भारतीय आयुर्विमा महामंडळातील (LIC) प्रथम श्रेणी अधिकारी नोकरभरतीत जाणीवपूर्वक मराठी उमेदवारांना डावलण्याचा प्रकार सुरू असून, बढती व बदली प्रक्रियेतही मराठी अधिकाऱ्यांवर अन्याय केला जात आहे. या मनमानी, अन्यायकारक आणि मराठीविरोधी धोरणांचा जाहीर निषेध करण्यासाठी भारतीय विमा कर्मचारी सेना व स्थानीय लोकाधिकार समितीच्या वतीने योगक्षेम, चर्चगेट येथे तीव्र व आक्रमक निदर्शने करण्यात आली.

LIC व्यवस्थापनाकडून मराठी अधिकाऱ्यांची होत असलेली गळचेपी अजिबात सहन केली जाणार नाही, असा ठाम इशारा यावेळी देण्यात आला. नोकरभरती आणि बढती प्रक्रियेत मराठी उमेदवारांना जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचा निषेध नोंदवित, “मुलाखत” हा पर्याय तात्काळ रद्द करून पूर्वीप्रमाणे सेवा ज्येष्ठतेनुसारच बढती देण्यात यावी, तसेच प्रादेशिक पश्चिम क्षेत्रात बदली देण्याची सक्ती करण्यात यावी, अशी ठोस मागणी आमदार सुनिल शिंदे यांनी केली.

यासंदर्भात भारतीय आयुर्विमा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. रावकर पटनायक, कार्यकारी संचालक (कार्मिक) सुशी लता माईसफत आणि कार्यकारी संचालक (का.से.) प्रदीप केळकर यांच्या उपस्थितीत महासंघाच्या शिष्टमंडळाने सविस्तर चर्चा करून लेखी निवेदन सादर केले. मराठी माणसांच्या हक्कांवर गदा आणणारे निर्णय तात्काळ मागे न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देत, “हा अन्याय सहन केला जाणार नाही,” अशी ठाम भूमिका मांडण्यात आली.

यावेळी शिवसेना नेते तथा खासदार मा. श्री. अरविंद सावंत, खासदार श्री. संजय दिना पाटील, स्था. लो. स. कार्याध्यक्ष श्री. विलास पोतनीस, सरचिटणीस श्री. प्रदीप मयेकर, एल आय सी युनिट सरचिटणीस महेश लाड, कार्याध्यक्ष गोपाळ शेलार, शरद एक्के, संजय डफळ, अजय गोयल, आल्हाद नाईक तसेच विविध विभागीय युनिटचे पदाधिकारी, महिला-पुरुष कर्मचारी, महिला आघाडी व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *