मुंबई मुनिसिपल कामगार संघाच्या वतीने कामगारांच्या विविध मागण्यासाठी आझाद मैदानात झाले आंदोलन.

 मुंबई मुनिसिपल कामगार संघाच्या वतीने कामगारांच्या विविध मागण्यासाठी आझाद मैदानात झाले आंदोलन.

मुंबई, दि ५: मुंबई मुनिसिपल कामगार संघाच्या वतीने कामगारांच्या विविध मागण्या साठी आजाद मैदान येथे आंदोलन करण्यात आले याबाबत महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना निवेदन देऊन कामगारांचे विविध प्रश्न त्यांचे समोर मांडण्यात आले. यामध्ये
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील मलनिःसारण, बाजार खाते, किटक नाशक अधिकारी, देवनार कत्तलखाना रोडरिपेअर, जलअभियंता, परिरक्षण, रुग्णालयातील आया, कक्ष परिचर या पदाबर सफाई कामगारांमधून पदोन्नतीने नियुक्त झालेल्या कामगारांना महाराष्ट्र शासनाने २०२३ मध्ये पारित केलेल्या परिपत्रकाप्रमाणे वारसा हक्क नोकरी महाराष्ट्र शासन निर्णय क्र सफाई २०१८/प्र.क्र.४६/सआक, दि. २४ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या आदेशानुसार वारसा हक्क नोकरी देण्यात यावी. तसेच घन कचरा व्यवस्थापन खात्यातील मोटर लोडर कामगारांवर त्याच पदावर (मोटर लोडर ) कायम स्वरुपी काम देण्यात यावे.त्याचप्रमाणे महानगरपालिकेतील सफाई कामगारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजने अंतर्गत मोफत सदनिका उपलब्ध करुन देण्यात यावे.
तसेच महानगरपालिकेतील विविध आस्थापनेवरील सर्व कामगार कर्मचारी, अधिकारी या संवर्गातील रिक्त पदे त्वरीत भरण्यात यावीत.
तसेच महाराष्ट्र शासनाच्या धरतीवर जुनी पेन्शन योजना त्वरीत लागू करण्यात यावी. सर्वच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कचरा वाहातुक श्रमिक संघाच्या कंत्राटी कामगारांना कायम करण्यात आल्यामुळे जवळपास २००० बारसा हक्क मंजूर झालेले प्रकरणे नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहे. तरी वारसा हक्क प्रकरणाच्या उमेदवरांना त्वरीत नियुक्त आदेश देण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. तसेच प.क.व्य. मलनिःसरण, किटक नाशक, बाजारखाते, उद्यान खाते, या चतुर्थ श्रेणी कामगार अशिक्षित असल्यामुळे त्यांना जणगणनेच्या कामाकरीता पाठविण्यात येवु नये.
अशा विविध मागण्या या ठिकाणी आंदोलनामध्ये मांडण्यात आल्या.
जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू झाले अशी माहिती सरचिटणीस
सतीश राजगुरु आणि मिलिंद सावंत यांनी दिली.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *