रुग्णांना मोठा दिलासा, मुख्यमंत्री सहाय्यता निधी (CMRF) पोर्टल आता ऑनलाइन

 रुग्णांना मोठा दिलासा, मुख्यमंत्री सहाय्यता निधी (CMRF) पोर्टल आता ऑनलाइन

मुंबई दि २७ : महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री सहाय्यता निधी (CMRF) पोर्टल आता पूर्णपणे ऑनलाइन सुरू केले असून यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. यापूर्वी रुग्णांना मंत्रालय किंवा शासकीय कार्यालयात जावे लागत होते, मात्र आता ही संपूर्ण प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. संबंधित सल्लग्नित रुग्णालयेच रुग्णांच्या वतीने अर्ज भरून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणार आहे.

या नव्या प्रणालीअंतर्गत अर्ज मंजूर झाल्यानंतर अवघ्या ८ तासांच्या आत मंजूर रकमेपैकी ३०% रक्कम वितरित केली जाईल. उर्वरित रक्कम रुग्णालयाकडून उपचाराचा उपयोग (Utilization) सादर केल्यानंतर दिली जाईल. तसेच, अर्जाची सर्व माहिती व स्थितीबाबतचे अपडेट्स रुग्णांना त्यांच्या मोबाईलवर SMS द्वारे मिळणार आहेत.

CMRF अंतर्गत समाविष्ट उपचार व आजार:

कॉक्लिअर ट्रान्सप्लांट, हृदय, यकृत, मूत्रपिंड व फुफ्फुस प्रत्यारोपण, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, हात पुनर्निर्माण शस्त्रक्रिया, हिप व गुडघा प्रत्यारोपण, कॅन्सर शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन थेरपी, नवजात शिशूंचे आजार, दोन चाकी अपघात, बालरोग शस्त्रक्रिया, डायलिसिस तसेच भाजणे व विजेचे भाजणे यांसारख्या उपचारांचा समावेश आहे.

आवश्यक कागदपत्रे:

आधार कार्ड, रेशन कार्ड, तहसीलदार यांचे ₹1.6 लाखांखालील उत्पन्न प्रमाणपत्र, रुग्णाचा जिओ-टॅग फोटो, अपघात प्रकरणांसाठी FIR प्रत व ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेसाठी ZTCC प्रमाणपत्र आवश्यक आहे.

अर्ज करण्यासाठी लिंक (रुग्णालयांसाठी):

https://cmrf.maharashtra.gov.in
https://cmrf.maharashtra.gov.in

अधिक माहितीसाठी संपर्क:

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष जिल्हा कार्यालय, कक्ष क्रमांक २११, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, राज्यातील सर्व जिल्ह्यात.
ही ऑनलाइन प्रणाली रुग्णांना जलद, पारदर्शक व सुलभ पद्धतीने आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *