या राज्यात ९ दिवस मद्यविक्रीवर बंदी

 या राज्यात ९ दिवस मद्यविक्रीवर बंदी

कोलकाता, दि. २१ : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मद्यबंदीच्या आदेशामुळे राजकीय आणि व्यापारी वर्तुळात नवा वाद पेटला आहे. विशेष म्हणजे, ज्या भागात पहिल्या टप्प्यात मतदान नाही, तिथेही मद्यविक्रीवर बंदी घालण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नव्या आदेशानुसार, 20 एप्रिलपासूनच राज्यात मद्यविक्री आणि सेवा देण्यावर निर्बंध लागू झाले आहेत. 23 एप्रिलपर्यंत दारूची दुकाने बंद राहतील. 24 एप्रिल रोजी दुकाने उघडतील, मात्र पुन्हा 25 एप्रिलच्या संध्याकाळपासून 29 एप्रिलपर्यंत बंदी असेल. तसेच 4 मे रोजी मतमोजणीच्या दिवशीही ‘ड्राय डे’ पाळला जाईल. अशाप्रकारे आगामी 15 दिवसांपैकी साडे नऊ दिवस बंगालमध्ये अधिकृतपणे मद्यविक्री बंद राहणार आहे. या निर्णयामुळे सध्या पश्चिम बंगालमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. मद्य विक्री करणाऱ्या दुकानदारांमध्ये मोठं नाराजीचं वातावरण आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *