आता मिळणार अतिरिक्त LPG सिलिंडर

 आता मिळणार अतिरिक्त LPG सिलिंडर

नवी दिल्ली, दि.21 : इराण -अमेरिका-इस्रायल युद्धामुळे देशभर गॅसच्या पुरवठ्यावर नियंत्रण आले आहे. याचा मुख्यत: फटका देशातील हॉटेल व्यावसायिकांना बसला आहे. अनेक हॉटेल्स आणि कॅन्टीन बंद होत आहेत.या समस्येवर काहीसा दिलासा म्हणून पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने व्यावसायिक एलपीजी (LPG) ग्राहकांसाठी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. सरकारने राज्यांच्या व्यावसायिक गॅस कोट्यात 20 टक्क्यांनी अतिरिक्त वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 23 मार्च 2026 पासून हा निर्णय लागू होणार आहे. त्यामुळे एकूण वाटप आता संकटपूर्व पातळीच्या 50 टक्क्यांपर्यंत पोहोचणार आहे.

पेट्रोलियम मंत्रालयाचे सचिव डॉ. नीरज मित्तल यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना याबाबत एक पत्र पाठवले आहे. यात त्यांनी या अतिरिक्त 20 टक्के गॅसचा फायदा देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. यामध्ये सामान्य लोकांशी संबंधित रेस्टॉरंट्स, रस्त्याच्या कडेला असलेले ढाबे, हॉटेल्स, औद्योगिक कँटीन आणि फूड प्रोसेसिंग (दुग्ध) युनिट्स यांचा समावेश आहे. याशिवाय, राज्य सरकारे किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांकडून चालवल्या जाणाऱ्या सवलतीच्या कँटीन आणि सामुदायिक स्वयंपाकगृहांनाही प्राधान्य देण्याबाबत भाष्य करण्यात आले आहे. तसेच स्थलांतरित कामगारांच्या गरजा लक्षात घेऊन 5 किलो एफटीएल (FTL) सिलेंडरचा पुरवठाही सुनिश्चित करण्याबाबत भाष्य करण्यात आले आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *