नूतन संवत्सर कसे राहील? देशातील भावी घडामोडींचा सखोल भविष्यवेध

 नूतन संवत्सर कसे राहील?  देशातील भावी घडामोडींचा सखोल भविष्यवेध

जितेश सावंत

दिनांक १९ मार्च २०२६ रोजी सकाळी ६ वाजून ५३ मिनीटांनी अमावास्या संपत असून त्याच दिवशी गुढीपाडव्यापासून नूतन संवत्सरास म्हणजेच शालिवाहन शके १९४८ ला प्रारंभ होत आहे. नवीन संवत्सराचे नाव “पराभव”आहे.
संवत्सराचे फळ- संवत्सराचा स्वामी हा केतू असून ,या संवत्सर काळात राज्यकर्ते युद्धाकडे प्रवृत्त होतील (युद्धाची ओढ असणारे असतील). जनतेमध्ये वेगवेगळ्या नवीन प्रकारच्या रोगांची वाढ होईल.

या संवत्सर वर्षात पाऊस कमी पडेल आणि उत्पन्न (पिकांची पैदास) देखील कमी प्रमाणात होईल. चैत्र आणि वैशाख महिन्यात धान्याचे भाव वाढतील (महागाई वाढेल), ढगांचा गडगडाट होईल, विजा चमकतील आणि वाऱ्याचा वेग जास्त राहील.

ज्येष्ठ महिन्यात वादळ-वाऱ्यामुळे नुकसान होईल. आषाढात पाऊस कमी असेल, परंतु श्रावण महिन्यात तो अधिक होईल. धान्याचे भाव स्थिर (समान) राहतील.
भाद्रपद महिन्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होईल. आश्विन महिन्यात धान्य आणि तेल, तूप इत्यादी महाग होतील, परंतु धातू स्वस्त होतील. त्यानंतर कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन या महिन्यांत धान्याचे भाव स्थिर राहतील.
नवीन वर्षाची पत्रिका ही मीन लग्नाची आहे. आणि ह्या वर्षी जास्तीत जास्त ग्रह हे प्रथम व व्यय स्थानी आहेत.

आगामी वर्ष आपल्या देशाला कसे जाईल ?

देशात असंतोष माजेल, प्रजेची मानसिकता तणावात राहील.मालक आणि मजूर(कामगार) यांच्यात संघर्ष वाढेल. देशातील प्रजेच्या आरोग्यच्या दृष्टीने प्रतिकूल, विचित्र रोगाच्या साथी पसरतील, साथीचे विकार, देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी प्रतिकूल महागाईत वाढ ,काही कायदे बदलतील, कर वाढेल. बेरोजगारीत वाढ वातावरणात अचानक बदल. अवकाळी पाऊस, देश्याच्या तसेच राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या कसोटीचा काळ. सत्ताधारी पक्षाला काळ अनुकूल असला तरी सुद्धा विरोध पक्षाची ताकद/सहानभूती वाढेल. राजकारणात मोठ्या भानगडी निर्माण होतील, राजकारणी,
कारखानदार,ज्येष्ठ व्यक्ती तुरुंगात जाण्याची शक्यता अधिक. अधिकारी वर्गास प्रतिकूल. राजकीय नेत्यांचे खून किंवा आत्महत्या.

उद्योगधंद्याना प्रतीकूल,तुरुंग, इस्पितळे, चॅरिटेबल दवाखाने,वेड्यांची इस्पितळे याना प्रतिकूल सरकारचे याकडे दुर्लक्ष होईल. हॉस्पिटलमध्ये मारामाऱ्यांची प्रकरणे समोर येईल.
हॉस्पिटलमध्ये अनैतिक कामे होतील, मानवी शरीराच्या भागांची तस्करी तसेच मुलांची अदलाबदली , रेल्वे,
बस सेवा ,पोस्ट ऑफिस सेवा ,टेलीफोन ,दूरदर्शन यामध्ये अडचणी निर्माण होतील. संप होतील
हिंसा,स्फोटक घटना, गोळीबार, जाळपोळ,
आगीच्या घटना(तुरुंगात /हॉस्पिटलमध्ये शक्यता अधिक). कैदी तुरुंगातून पळून कण्याचा प्रयत्न करतील.

जमिनीचे भाव वाढतील, घरांच्या योजना/प्रकल्प पुढे सरकत,नवीन पाणीपुरवठा योजना किंवा रखडलेल्या योजना सुरु होतील. खाण उद्योगाची स्थिती बरी राहील.
उच्च पदावरील लोक नाखूष राहतील. अनेक मोठ्या पदावरील लोकांचे राजीनामे.
देशात अत्याचार, मारामाऱ्या,
खून,दरोडे,लूटमार होतील. गुन्हेगारीत वाढ, मोठ्या प्रमाणात टोळीयुद्ध ,
परदेशातील गुन्हेगार पकडले जाण्याची शक्यता , पोलिस दल तसेच लष्कर संबंधी वादविवाद, भ्रष्टाचार प्रकरणे उघडकीस येईल.

भ्रष्टाचार,अंमली पदार्थ सेवन,गुन्हे ,आत्महत्या,डिप्रेशन हे प्रकार समाजात वाढताना दिसतील. अनैतिक आचरण तसेच फसवणुकीचे प्रकार वाढतील, सायबर गुन्ह्यात वाढ , गुप्त शत्रूंचा वावर वाढेल(स्त्रियांचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता) ,देशद्रोही कारवाया वाढतील/ ऊत, देशाच्या सरहद्दीवर/बॉर्डरवर भानगडी निर्माण होतील. देश्याच्या अनेक भागात शत्रू राष्ट्रातील लोक अवैध मार्गाने घुसतील. हवेतून /अवकाशातून मोठ्या प्रमाणात होतील, क्षेपणास्त्रे ( गेल्या तीनचार वर्षांपासून अनेक पोस्ट मध्ये अश्या प्रकारच्या हल्ल्याचे भाकीत मी केले होते, सध्याची ग्रहस्थिती सुद्धा तीच )

रेलवे, रस्ते आणि विमान अपघातात वाढ. विमानसेवेत गडबड.विमान कर्मचाऱ्यांचा/कामगारांचा संप होण्याची शक्यता अधिक अंतरिक्षात अनर्थकारी घटना घडतील.
समाजातील लोकप्रिय नेते किंवा आंदोलक यांना तुरुंगवास संभवतो. लहान मुलांना प्रतिकूल.लहान मुलांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याने शिक्षा /तुरुंगवास. सुधारगृहातील अव्यस्था समाजसमोर येईल. हॉस्पिटल आणि दान देणाऱ्या संस्थांमध्ये आर्थिक घोटाळे/ भ्रष्टाचार. खोटे दस्तऐवज सादर करून गुन्हे.
व्हिसा /पासपोर्ट नियमात बदल होतील. ह्या वर्षी काही आनंददायी घटना ही घडतील कलाकार,चित्रपट,मनोरंजन क्षेत्र खास करून स्त्री कलाकार ह्यांच्या करीता काळ चांगला. चांगले चित्रपट येईल, स्त्री कलाकारांचे चांगले चित्रपट येतील. महिलांसाठी नवीन सामाजिक योजना येतील. ह्या वर्षी पावसाचे प्रमाण सरासरी एवढा किंवा कमी राहणाची शक्यता अधिक आहे.

गहू तांदूळ,चणा ,कापूस पिकांसाठी प्रतिकूल, तेल,तूप यांच्या भावात वाढ होईल.
उत्तरेतील राज्यात पूर,
अतिवृष्टी त्यामुळे मोठे नुकसान/हानी संभवते. महाराष्ट्रात ५/६ जून तारखेपर्यंत पाऊस सुरु होईल .वर लिहिल्याप्रमाणे श्रावणात पाऊस जोर धरण्याची शक्यता अधिक
ह्या वर्षी देखील शेअर मार्केट करीता काळ प्रतिकूल आहे. मोठे चढ उतार आपल्याला पाहावयास मिळतील.
( ह्या विषयी मी मागे सुद्धा सूर्यग्रहण व चंद्र ग्रहण ह्या पोस्ट मध्ये मांडले आहे त्याची लिंक देखील शेअर करतो )
https://mmcnewsnetwork.com/sloareclipse/ https://mmcnewsnetwork.com/lunareclips/ )

लेखक

के. पी. विशारद , नक्षत्र सम्राट, वास्तू तज्ञ (Astro Vastu Consultant)
शेअर बाजार, अर्थविषयक घडामोडी, सायबर कायदा तसेच डेटा प्रोटेक्शन कायदा तज्ज्ञ आहेत.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *