12 मुस्लिम देश इस्लामविरोधात आले एकत्र
मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढला आहे. इराणकडून सातत्याने होत असलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे सौदी अरेबिया, पाकिस्तानसह १२ मुस्लिम देश एकत्र आले असून त्यांनी तेहरानला कठोर इशारा दिला आहे. या बैठकीनंतर इराणविरोधात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.सहभागी देश: अझरबैजान, बहरेन, इजिप्त, जॉर्डन, कुवेत, लेबनॉन, पाकिस्तान, कतार, सौदी अरेबिया, सीरिया, तुर्की, संयुक्त अरब अमिरात (UAE)
इराण कडून सातत्याने होणारे क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले, ज्यामुळे नागरी पायाभूत सुविधा, तेल शुद्धीकरण केंद्रे, विमानतळ, पाणी शुद्धीकरण प्रकल्प आणि निवासी भाग बाधित झाले आहेत.
अमेरिका आणि इस्रायलने आपल्या गॅस प्रकल्पांवर केलेल्या हल्ल्यांमुळे संतप्त झालेल्या इराणने गुरुवारी आखाती देशांवर मोठा हल्ला केला. तेहरानने सौदी अरेबिया, कतार आणि संयुक्त अरब अमिरातीच्या अनेक महत्त्वाच्या तेल आणि गॅस प्रकल्पांना लक्ष्य केले आहे. इराणने कतारच्या गॅस प्रकल्पांवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. या हल्ल्यानंतर सौदी अरेबिया संतप्त झाला आहे. सौदी अरेबियाने आज इराणला कडक इशारा दिला आहे. सौदीचे परराष्ट्र मंत्री फैसल बिन फरहान अल सौद म्हणाले, “इराणला प्रत्युत्तर देण्याची आमच्या देशात पूर्ण क्षमता आहे. इराणचे हल्ले पूर्वनियोजित असल्याचे दिसते आणि त्यांनी आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नये असा इशारच त्यांनी दिला आहे.