प्रसिद्ध कार्टून शो डोरेमॉनच्या‌ दिग्दर्शकाचे निधन

 प्रसिद्ध कार्टून शो डोरेमॉनच्या‌ दिग्दर्शकाचे निधन

जगभरातील लहान मुलांचा आवडता कार्टून शो ‘डोरेमॉन’चे दिग्दर्शक शिबायामा त्सुतोमू यांचे निधन झाले आहे. ते 84 वर्षांचे होते. फुफुसांच्या कॅन्सरमुळे त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन दशकांहून अधिक काळ ‘डोरेमॉन’ या मालिकेचे दिग्दर्शन करणाऱ्या ॲनिमेशन क्षेत्रातील मोठ्या दिग्दर्शकाचं निधन झाल्याने मनोरंजनसृष्टीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. भारतासह अनेक देशांमध्ये लोकप्रिय असलेल्या डोरेमॉन या कार्टून मालिकेच्या यशात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता.आजही डोरेमोनमधील पात्रे लहान मुलांमध्ये तितकीच लोकप्रिय आहेत. त्यांच्या निधनाची अधिकृत माहिती अजिया – डो – ॲनिमेशन वर्क्स या स्टुडिओने 17 मार्च 2026 रोजी दिलीय. मात्र त्यांचे निधन 6 मार्च रोजीच झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. स्टुडिओने जारी केलेल्या निवेदनात असं म्हटलंय की, ” शिबायामा त्सुतोमू यांनी वीस वर्षांहून अधिक काळ डोरेमोन मालिकेचे दिग्दर्शन केले.6 मार्च रोजी त्यांचे फुफुसांच्या कॅन्सरमुळे निधन झाले . त्यांच्या एनिम इंडस्ट्रीतील योगदानाचे ही विशेष कौतुक करण्यात आले होते. अनेकदा त्यांना ‘नॅशनल ॲनिमेशनचे जनक’ असेही म्हटलं गेलंय. 1979 साली त्यांनी डोरेमोन या टीव्ही मालिकेचे दिग्दर्शन सुरू केले. त्यानंतर या फ्रॅंचाईजीवर आधारित तब्बल 22 चित्रपटांचा दिग्दर्शनही त्यांनी केलं.त्यामुळे डोरेमोन आज अनेक पिढ्यांमध्ये लोकप्रिय आहे.शिबायामा यांनी 1963 मध्ये टोई ॲनिमेशनमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर ते ए प्रोडक्शन म्हणजेच आताचे ‘शिन एई ॲनिमेशन ‘ मध्येही सामील झाले. डोरेमोन व्यतिरिक्त त्यांनी चीबी मारुको, लुपिनIIII आणि मजिमे नी फुमाजिमे कारकेत्सु जोरोरी यांसारख्या अनेक लोकप्रिय ॲनिमेशन प्रोजेक्टचे दिग्दर्शन केले होते.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *