राज्यातील मैदानावर विशेषतः महिला खेळाडूंसह नोकरदार महिलांसाठी स्वच्छतागृहे कधी निर्माण करणार, आमदार मिलिंद नार्वेकर यांची विधान परिषदेत मागणी

 राज्यातील मैदानावर विशेषतः महिला खेळाडूंसह नोकरदार महिलांसाठी स्वच्छतागृहे कधी निर्माण करणार, आमदार मिलिंद नार्वेकर यांची विधान परिषदेत मागणी

मुंबई, दि १८
राज्यातील मैदानावर विशेषतः महिलां खेळाडूसह नोकरदार महिलांसाठी स्वच्छतागृह कधी निर्माण करणार. तसेच क्रीडांगणामध्ये चेंजिंग रूम नसल्याने अनेक प्रकारच्या आरोग्य विषयक समस्या निर्माण झाल्या असून अनेक रोगांना सामोरे जावे लागत असून अनेक क्रीडा स्पर्धापासून या महिन्यांना वंचित राहावे लागत आहे असा प्रश्न विधान परिषदेला विचारला होता. त्यावर शासनाने लोकायुक्त यांच्या निर्देशानुसार विशेष चौकशी पथक घडीत करण्यात आले आहे. त्यानुसार नगर विकास विभागाने राज्यातील सर्व मैदानी आणि क्रीडांगणे येथे महिलांसाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अत्याधुनिक स्वच्छता अभियानाचे निर्देश सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांना दिले आहे. त्यानुसार राज्यातील सर्व मैदानावर महिलांसाठी स्वच्छतागृह बांधण्याबाबत 24 मार्च रोजी बैठकीचे आयोजन केले असून या बैठकीला संबंधित मंत्री आणि अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *