रिपब्लिकन पक्षाचा (खोरिपा) आझाद मैदानावर विविध मागण्यांसाठी मोर्चा
मुंबई, दि १२
जनतेच्या विविध मागण्यांच्या सोडवणूकीसाठी आझाद मैदान मुंबई येथे काढण्यात आलेल्या मोर्चात रिपब्लिकन पक्षाच्या (खोरिपा) वतीने राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली राज्याच्या अर्थसंकल्पातील १५ निधी अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात यावा असा शासन निर्णय दि २१ जून १९७९ रोजी राज्य सरकारने काढला होता त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी, अनुसूचित जाती जमाती चा निधी इतरत्र वळविण्यात येऊ नये यासाठी कायदा करावा, अनुसूचित जाती जमातीं ओबीसी च्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, शिष्यवृत्ती,पी एच डी विद्यार्थ्यांना फेलोशिप, परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेकरीता रु आठ लाख उत्पन्नाची मर्यादा रद्द करावी, सरकारने अनुसूचित जाती जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागासवर्गीयांचा राखीव जागांचा अनुशेष भरून काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात यावा,नोकर भरती प्रक्रिया राबवावी, खाजगी क्षेत्रातील नोकर भरतीमध्ये आरक्षण धोरण लागू करावे, कंत्राटी पद्धतीने नोकर भरतीमध्ये आरक्षण धोरण लागू करावे,बेरोजगार तरुणांना बेकारी भत्ता देण्यात यावा, अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती यांना पदोन्नतीतील आरक्षण सुरू करावे, करोडपती असलेल्या माजी आमदार, खासदार यांची पेन्शन बंद करावी त्यांना क्रिमिलेयर लावण्यात यावे, मुंढवा येथील महार वतनी जमीन घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, गैरहस्तांतर झालेल्या महार वतनी जमीनी मुळ वतनदारांना परत कराव्यात, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, घरकुल योजनेच्या निधीत शहरी व ग्रामीण असा भेद न करता दुप्पट वाढ करावी, अतिक्रमित रहिवाशांना जागेचे मालकी पट्टे देण्यात यावेत, अंगणवाडी सेविका, आशा सेविकांना, कोतवालांना शासकीय कर्मचारी दर्जा देण्यात यावा, सर्व महामंडळाच्या,प्राधिकरणाच्या कर्मचारी अधिकारी यांना जुनी शासकीय पेन्शन योजना लागू करावी, महाबोधी महाविहार मुक्तीसाठी सन १९४९ चा बी टी अक्ट रद्द करावा अशी शिफारस राज्य सरकारने केंद्र सरकारकडे करावी, मागासवर्गीयांच्या न्याय हक्कासाठीची युजीसीची सन २०२५ ची नियमावली लागू करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे शिफारस करावी, आदी विविध मागण्यांच्या सोडवणूकीसाठी पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनावर बुधवार दि ११ मार्च रोजी दुपारी २-०० वा धडक मोर्चा काढण्यात आला पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाऊ निरभवणे यांच्या नेतृत्वाखालील ह्या मोर्चाला नांदेड येथील जेष्ठ नेते महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रा अशोक ढोले, राष्ट्रीय संघटक सचिव भिमराव चौरे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विनोद साळवी, हेमंत मोकळ, चंद्रकांत घोडके,विदर्भ प्रदेश अध्यक्ष सी पी रामटेके, नागपूर प्रदेश माजी अध्यक्ष राजू भाऊ गजभिये, चंद्रपूर शहर अध्यक्ष मुन्नाभाऊ खोब्रागडे, अमरावती जिल्हा अध्यक्ष एड दिलीप घरडे, सचिव चरणदास नंदागवळी, नागपूर सुदर्शन मून, अकोला गोवर्धन अभ्यंकर, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष मनोहर भिडे, मुंबई प्रदेश अध्यक्ष भागवत कांबळे, सचिव विक्रांत पाटील, विक्रम कांबळे,राजेंद्र मांजळकर, गणेश साठे, किशन शर्मा,सनी सातपुते संभाजीनगर येथील महाराष्ट्र प्रदेश विधी सल्लागार एड मोहन कोरडे , ईश्वर ताथवडे, इत्यादी ची भाषणे झाली.KK/ML/MS