बिबट्यांना शेड्युल दोन मध्ये आणण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

 बिबट्यांना शेड्युल दोन मध्ये आणण्यास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मुंबई दि ११ : राज्यातील बिबट्यांचा वाढता वावर आणि माणसावरील हल्ले पाहता बिबट्यांना शेड्युल एक मधून शेड्युल दोन मध्ये आणण्याच्या प्रस्तावाला कालच राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली.

याबाबतची लक्षवेधी सूचना सत्यजित देशमुख यांनी उपस्थित केली होती त्यावर गोपीचंद पडळकर, समीर कुणावर, प्रकाश सुर्वे आदींनी उपप्रश्न विचारले . केंद्रीय वन्यजीव मंडळाने परवानगी दिल्यानुसार काही बिबट्यांवर नसबंदी करण्यात येत आहे. काही जेरबंद केलेले बिबटे इतर राज्यांनी मागणी केले आहेत त्यांना स्थानांतरित करण्यात येतील. पंचवीस बिबटे वनतारा मध्ये स्थलांतरित करण्यात आले आहेत आणखी पंचवीस पुढील टप्प्यात करण्यात येतील असं ही मंत्र्यांनी सांगितलं. ज्या जंगलात झाडे पुरेशी मोठी झालेली आहेत त्या जंगलात मेंढपाळाना जाण्याची परवानगी द्यावी अशी सूचना विभागाला देण्यात आल्या आहेत अशी माहितीही मंत्री नाईक यांनी यावेळी दिली.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *