मुंबईतील दुमजली झोपड्यांना पुनर्विकास योजनेत मान्यता नाही
मुंबई दि ११ : मुंबई शहरात असणाऱ्या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेसाठी केवळ जमिनीवर असलेल्या झोपड्यानाच प्रचलित कायद्यानुसार ग्राह्य धरण्यात येईल , झोपड्यांच्या पोटमाळ्यावरील लोकांना नाही असं स्पष्ट उत्तर प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं.
याबाबतचा मूळ प्रश्न सुनील प्रभू यांनी उपस्थित केला होता त्यावर वरुण सरदेसाई, अस्लम शेख, मुरजी पटेल, दिलीप लांडे यांनी उपप्रश्न विचारले. पोटमाळ्यावरील लोकांना समाविष्ट केलं नाही तर मुंबई झोपडपट्टी मुक्त होणार नाही असं मत सदस्यांनी मांडलं त्याला अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अनुमोदन दिलं आणि सरकारनं याचा विचार करावा अशी सूचना केली. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून त्यावर विचार करण्यात येईल असं मंत्री म्हणाले.ML/ML/MS