शिव मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाकरिता एकता नगरच्या जवळपास 30 घरांना खाली करण्याचे पालिकेचे आदेश

 शिव मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाकरिता एकता नगरच्या जवळपास 30 घरांना खाली करण्याचे पालिकेचे आदेश

उल्हासनगर, दि २७: प्राचीन शिव मंदिराच्या परिसराच्या विकासासाठी उल्हासनगरतील कॅम्प नंबर -५ परिसरातील कैलास कॉलनी येथील एकता नगर मधील जवळपास ३० हून अधिक घरांना उल्हासनगर महानगरपालिकेने नोटीस बजावून त्यांना त्वरित आपले घर खाली करण्याचे आदेश दिले आहे. अन्यथा पालिकेच्या वतीने घरांवर तोडक कारवाई केली जाईल असा इशारा दिल्याने त्यातील रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. जवळपास ४० ते ५० वर्षापासून त्या ठिकाणी आपण वास्तव्यास आहोत. आम्हाला जोपर्यंत पर्याय जागा देत नाही तोपर्यंत आम्ही आमचे घर खाली करणार नाही असा इशारा संतप्त नागरिकांनी महानगरपालिकेला दिला आहे. आता महानगरपालिका यावर कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
अंबरनाथच्या प्राचीन शिव मंदिराच्या परिसराचे शुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी उल्हासनगरतील कॅम्प नंबर -५ परिसरातील कैलास कॉलनी येथील एकता नगर मध्ये राहणाऱ्या जवळपास ३० ते ३५ घरे बाधित होणार आहेत. एकंदरीत 30 ते 35 कुटुंब उघड्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या वर्षी देखील उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने ही घरे बेकायदेशीर असल्याचे सांगत त्यांना नोटीसा बजावला होत्या. उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त यांनी गेल्या वर्षी अंबरनाथच्या मुख्याधिकारी यांना पत्र देत त्यांनी या घरांचे जोपर्यंत पुनर्वसन व त्यांना पर्याय जागा देत नाही तोपर्यंत आम्ही यांची घरे खाली करणार नाही व कारवाई करणार नाही असे सांगितले होते. पण आता उल्हासनगर महानगरपालिकेने नोटीसी बजावून त्या परिसरातील नागरिकांना त्वरित आपले घर खाली करण्याचे आदेश दिल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहेत. जवळपास ४० ते ५० वर्षापासून एकता नगर परिसरात ३० ते ३५ घरांचे कुटुंब त्या ठिकाणी राहत असल्याचे ते सांगत आहेत.. पालिका आता या घरांवर कारवाई करणार असल्याच्या नोटीशी बजावल्याने हे कुटुंब बेगर होणार आहेत. यासंदर्भात न्यायालयात खटला देखील सुरू असल्याचे व त्याची सुनावणी २ मार्च रोजी होणार असल्याचे त्या परिसरातील नागरिक सांगत आहेत.
त्या परिसरातील रहिवाशांचे असे म्हणणे आहे की प्रशासनाने प्रथम नुकसान भरपाई द्यावी व पर्यायी जागेची व्यवस्था करावी त्यानंतरच ते स्वतःहून घरे रिकामी करून प्रशासनाच्या ताब्यात देतील. पालिकेने अचानक सुरू केलेल्या कारवाईमुळे नागरिकांना बेघर होण्याची वेळ आली असल्याचे ते सांगत आहेत. त्यावेळी एकता नगर परिसरातील नागरिक एकत्र मोठ्या संख्येने गोळा होऊन पालिकेच्या कारवाईच्या विरोधात उभे राहिले व प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. याप्रकरणी प्रशासनाने योग्य तो तोडगा काढावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आम्हाला न्याय द्यावा, गेल्या ४० ते ५० वर्षापासून आम्ही ज्या ठिकाणी राहतो ते घर खाली करण्याआधी आम्हाला पर्याय जागा देण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *