होळीच्या सणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका संचलित महिला बचत गटांकडून ‘पुरणपोळी महोत्सव २०२६

 होळीच्या सणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका संचलित महिला बचत गटांकडून ‘पुरणपोळी महोत्सव २०२६

मुंबई, दि २६
पुरणपोळी महोत्सव अंतर्गत https://shgeshop.com या संकेतस्थळावर दिनांक २६ फेब्रुवारी पासून
होळीचा सण जवळ आला की सारेच जण ‘होळी रे होळी, पुरणाची पोळी’, अशी हाळी देतात. मुंबईकरांना होळीच्या सणाला घरपोच पुरणपोळीचा स्वाद चाखायला मिळणार आहे. होळी सणाच्या निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिकेने अर्थसहाय्य केलेल्या महिला बचत गटांनी तयार केलेल्या पुरणपोळ्या मुंबईकरांना उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी आज, दिनांक २६फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ दरम्यान ‘पुरणपोळी महोत्सव २०२६’ होणार आहे. या अंतर्गत https://shgeshop.com या संकेतस्थळावर नागरिक ऑनलाईन नोंदणी करू शकतात. त्यानंतर दिनांक २ मार्च २०२६ रोजी पुरणपोळ्यांचे घरपोच वितरण केले जाणार आहे.

मुंबईतील गरजू आणि होतकरू महिलांना आर्थिक सक्षम तसेच स्वावलंबी करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आर्थिक सहाय्याने महिला बचत गट निर्माण करण्यात आले आहेत. नियमित उपक्रमांच्या पलीकडे जाऊन या महिला बचत गटांना नाविन्यपूर्ण व व्यवसायाभिमुख उपक्रमांच्या मदतीने अधिक संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सतत प्रयत्नशील असते. बृहन्मुंबई महानगरपालिकेने अर्थसहाय्य केलेल्या या महिला बचत गटांनी गत वर्षी गुढीपाडव्याच्यानिमित्ताने देखील पुरणपोळी महोत्सव राबविला होता. त्याला मिळालेला उत्कृष्ट प्रतिसाद लक्षात घेता सार्वजनिक श्रीगणेशोत्सव-२०२५ च्या पार्श्वभूमीवर या महिला बचत गटांकडून ‘मोदक महोत्सव- २०२५’ चे देखील आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा पुरणपोळी महोत्सवाचे आयोजन केले आहे.

होळीच्या दिवशी पुरणपोळीला खूप मागणी असते. त्यामुळे वाढत्या मागणीचा विचार करून महिला बचत गटांनी हा महोत्सव सुरू केला आहे. या अंतर्गत पारंपरिक पुरणपोळी ग्राहकांना मिळणार आहेत. ज्यांना बचत गटांनी तयार केलेली पुरणपोळी हवी असेल त्यांनी https://shgeshop.com या संकेतस्थळावर दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ ते १ मार्च २०२६ या कालावधी दरम्यान ऑनलाईन मागणी नोंदवायची आहे. ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर, होळीच्या दिवशी म्हणजेच मंगळवार दिनांक ३ मार्च २०२६ रोजी संबंधित ग्राहकांना पुरणपोळी घरपोच मिळणार आहे, अशी माहिती संचालक (नियोजन) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर यांनी दिली आहे.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *