मुंबईतील नद्यांमध्ये प्रदूषण करणाऱ्या तबेल्यांवर कारवाई

 मुंबईतील नद्यांमध्ये प्रदूषण करणाऱ्या तबेल्यांवर कारवाई

मुंबई दि २६ : मुंबईतील दहिसर, पोयसर , ओशिवरा या नद्यांमध्ये मल मूत्राचे थेट विसर्जन करणाऱ्या तबेल्यांवर शासनाने प्रदूषणाच्या नोटीसा बजावून तातडीने कारवाई करावी आणि त्याचा अहवाल आठवडाभरात सभागृहात द्यावा असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.

याबाबतचा मूळ प्रश्न अबू आझमी यांनी उपस्थित केला होता त्यावर मनिषा चौधरी, योगेश सागर, दिलीप लांडे, अस्लम शेख आदींनी उपप्रश्न विचारले . या नद्यांच्या काठी असणारे तबेले हलविण्यासाठी नोटीसा दिल्या जातील आणि तिथे असलेली अनधिकृत बांधकामे तसेच अतिक्रमणे काढून टाकण्याची कारवाई करण्याच्या सूचना मुंबई महापालिकेला देण्यात येतील अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी यावेळी दिली.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *