ऑर्केस्ट्रा बारचे परवाने रद्द करण्यासाठी कायद्यात सुधारणा

 ऑर्केस्ट्रा बारचे परवाने रद्द करण्यासाठी कायद्यात सुधारणा

मुंबई दि २४ : राज्यात डान्सबार बंदी घालण्यात आली होती तो कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला, मात्र त्यानंतर ऑर्केस्ट्रा बार बाबत केलेले नियम लागू करण्यात आले आहेत, तरीही या नावाने डान्सबार चालवले जात असल्याच्या तक्रारींवर तपासणी करण्यात येऊन कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली.

हा प्रश्न सुभाष देशमुख यांनी उपस्थित केला होता, त्यावर भास्कर जाधव यांनी पनवेल परिसरात ऑर्केस्ट्रा बारच्या नावावर डान्सबार सुरू असल्याचा उल्लेख केला. अशा तक्रारींवर किमान तीन किंवा पाच वेळा सातत्याने अशा तक्रारींवर ज्या बारचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत त्यांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल , यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात येईल अशी ग्वाही देखील फडणवीस यांनी यावेळी दिली.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *