बृहन्मुंबई महानगरपालिका सुधार समिती अध्यक्षपदी श्रीमती संध्या विपुल दोशी (सक्रे) यांची बिनविरोध निवड
मुंबई, दि २३
बृहन्मुंबई महानगरपालिका सुधार समिती अध्यक्षपदी श्रीमती संध्या विपुल दोशी (सक्रे) यांची आज (दिनांक २३ फेब्रुवारी २०२६) बिनविरोध निवड करण्यात आली. पीठासीन अधिकारी महापौर श्रीमती रितू तावडे यांनी या बिनविरोध निवडीची घोषणा केली.
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ पार पडल्यानंतर सोमवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी महानगरपालिका विशेष सभेत सुधार समितीवर २६ महानगरपालिका सदस्यांची नामनिर्देशानुसार नियुक्ती करण्यात आली आहे. या वैधानिक समितीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याकरिता आज (दिनांक २३ फेब्रुवारी २०२६) सकाळी ११.०० वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सुधार समिती अध्यक्षपदासाठी श्रीमती संध्या विपुल दोशी (सक्रे) यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी महापौर श्रीमती रितू तावडे यांनी जाहीर केले.
सुधार समितीचे सर्व सदस्य, सहआयुक्त (सुधार) श्री. संजोग कबरे, महानगरपालिका सचिव श्रीमती मंजिरी देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते.KK/ML/MS