पेरू आणि पपईच्या शेतीतून घेतले लाखोचे उत्पन्न…..
भंडारा दि ६ :- धान शेतीला फाटा देत भंडारा जिल्ह्यातील हरदोली येथील डॉक्टर नारायण रामचंद्र झंझाड हे शेतकरी बागायती शेतीकडे वळले असून त्यांनी पेरूच्या शेतीतून लाखो रुपयाचे उत्पन्न घेतले आहे. डॉ. झंझाड यांनी BAMS चे शिक्षण घेतले आहे. त्यामुळे ते डॉक्टरकी सोबतच बागायती शेती करुन 3 एकरात पेरू आणि पपईची लागवड करीत एका वर्षात तब्बल 15लाख रुपयाचे उत्पन्न घेत शेतकर्यासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या पेरूची मागणी संपूर्ण भंडारा जिल्ह्यात असून धान शेतीसोबत इतरही शेतकऱ्यांनी बागायती शेती करावा असा सल्ला त्यांनी दिला आहे.ML/ML/MS