AIMIM ला महाराष्ट्रात मोठं यश
मुंबई, दि. १६ : मुंबईसह राज्यातील 29 महापालिका निवडणुकींचे निकाल जाहीर होत आहेत. भाजपला महापालिका निवडणुकीत निर्णायक कौल मिळाला आहे. . या निकालातील महत्त्वाची बाब म्हणजे असदुद्दीनं ओवेसी यांच्या AIMIM ने महापालिका निवडणुकीत मोठी बाजी मारली आहे. महाराष्ट्रातील 29 पैकी 13 महापालिकेत AIMIM चे 95 उमेदवार विजयी झाले आहेत. विशेष बाब म्हणजे AIMIM ने मुंबईत देखील जोरदार मुसंडी मारली आहे. अबू आझमी यांच्या समाजवादी पक्षाचा गड असलेल्या मानखुर्दमध्ये देखील AIMIM ने दमदार विजय मिळवला आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत AIMIM दुसऱ्या स्थानावर आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचा बालेकिल्ला असणाऱ्या मानखुर्दमध्ये AIMIM ने विजय मिळवला आहे. यामुळं अबू आझमी यांना मोठा धक्का बसला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमनं 24 जागांवर विजय मिळवला आहे. मालेगावमध्ये एमआयएमचे २० उमेदवार विजयी झाले आहेत. सोलापूर, धुळे, नांदेडमध्ये प्रत्येकी 8 याप्रमाणं AIMIM चे 24 उमेदवार या तीन महानगरपालिकांमधून विजयी झाले आहेत. समाजवादी पार्टीला मागे सारत एमआयएमची सरशी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. AIMIM चे अमरावतीत ६, ठाण्यात ५, नागपुरात ४ नगरसेवक विजयी झाले आहेत. चंद्रपूरमध्ये देखील एमआयएमनं विजयाचं खातं उघडलं आहे.
SL/ML/SL