प्रज्ञा वर्धिनी फाउंडेशन तर्फे २३ जानेवारी रोजी होणार ‘भारतोत्सव’.
मुंबई, दि. १४ : प्रज्ञा वर्धिनी फाउंडेशन तर्फे दरवर्षी २३ जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पराक्रम दिवस आयोजित करण्यात येतो. यंदा होणारा प्रज्ञा वर्धिनी फाउंडेशन तर्फे ‘भारतोत्सव’ हा अतीशय अभिमानास्पद व प्रेरणादायी प्रमुख उपक्रम आहे.
या पवित्र प्रसंगी अत्यंत प्रेरक व विचारप्रवर्तक असे विशेष सत्र आयोजित केले आहे. या सत्रामध्ये प्रसिद्ध वक्त्या व ‘ऑक्सिजन लेडी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीमती सुमेधा ताई चिथडे या सियाचीन मधील ऑक्सिजन प्लॅंट या प्रकल्पाबद्दल माहिती देणार आहेत. या कार्यक्रमाला शौर्यचक्र सन्मानित पॅरा कमांडो मधुसूदन सुर्वे तसेच संरक्षण दलातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
याच अनुषंगाने २३ जानेवारी रोजी सकाळी ‘Run for a Cause’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या धावण्याच्या उपक्रमामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन सीमेवर देशरक्षण करणाऱ्या आपल्या खऱ्या वीरांना मानवंदना अर्पण करावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
भारतोत्सव २०२६ हा भव्य कार्यक्रम २३ जानेवारी २०२६ रोजी, बोरीवली पश्चिम येथील प्रबोधनकार ठाकरे मिनी ऑडिटोरियममध्ये, रात्री ८.३० वाजता एका सुसंस्कृत व जागरूक प्रेक्षकवर्गाच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
कार्यक्रमास उपस्थित राहू इच्छिणाऱ्यांनी 9820382117 / 9920119254 या क्रमांकावर संपर्क साधावा आणि आपली सीट बुक करावी, असे आवाहन प्रज्ञा वर्धिनी फाउंडेशन तर्फे करण्यात आले आहे.ML/ML/MS