मौल्यवान धातूंनाही लागू होणार हॉलमार्किंग
मुंबई, दि. २९ : सरकारने चांदीच्या दागिन्यांसाठी आणि कलाकृतींसाठी ऐच्छिक हॉलमार्किंग सुरू केले आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे, आता सरकारने दागिने उत्पादकांना अस्सल कच्चा माल मिळेल यासाठी मौल्यवान धातूंना अर्थात बुलियनला देखील हॉलमार्किंग लागू करण्याचा विचार केंद्र सरकारने सुरू केला आहे. त्याचबरोबर प्रयोगशाळेत कृत्रिमरीत्या तयार करण्यात येणाऱ्या (लॅबग्रोन) हिऱ्यांसाठीही नियम तयार करण्याचा सरकार विचार करत आहे.
नैसर्गिक आणि लॅबग्रोन हिरे यांतील फरक ग्राहकांना समजून घेता यावा यासाठी, सरकार या विभागात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्यासाठी एक नियमांची चौकट तयार करण्याची योजना आखण्यात येत आहे. हॉलमार्किंग हे मौल्यवान धातूंच्या शुद्धतेचे प्रमाणपत्र आहे. जून २०२१ पासून सोन्याच्या दागिन्यांसाठी ते अनिवार्य करण्यात आले, तर चांदीचे दागिने आणि कलाकृतींसाठी 1 सप्टेंबर 2025 पासून ते ऐच्छिक करण्यात आले आहे.
SL/ML/SL