शालेय पोषण आहारातून 32 विद्यार्थ्यांना विषबाधा
सांगली, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सांगली शहरातल्या वानलेसवाडी येथील शाळेमधील विद्यार्थ्यांना विष बाधा झाल्याचे प्रकार घडला आहे. सुमारे 32 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
सर्व विद्यार्थ्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.विजयनगर इथल्या वानलेसवाडी हायस्कूल येथील पाचवी ते सातवीतील देण्यात आलेल्या पोषण आहार मधून विषबाधा झाल्याचा समोर आला आहे.32 students poisoned by school nutrition
मळमळ, उलटी आणि जुलाब हा प्रकार सुरू झाल्यानंतर शिक्षकांनी तातडीने या मुलांना स्थानिक आरोग्य केंद्रा मधील डॉक्टरांना बोलून दाखवलं,मात्र त्यानंतर अधिक त्रास होणाऱ्या 32 विद्यार्थ्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले, सध्याचे परिस्थितीमध्ये या सर्वांची प्रकृती स्थिर आणि उत्तम असल्याचा माध्यमिक शिक्षण विभागाचे अधिकारी मोहन गायकवाड यांनी सांगितला आहे.
घटनेची माहिती मिळताच शिक्षणाधिकारी गायकवाड यांनी सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये धाव घेतली होती.यातील काही विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देखील करण्यात आले आहे.
ML/KA/PGB
27 Jan. 2023