नाशिक पदवीधर मतदारसंघात १६ जण रिंगणात…

 नाशिक पदवीधर मतदारसंघात १६ जण रिंगणात…

नाशिक, दि 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी आज उमेदवारांचे अर्ज मागे घेण्याच्या आज अखेरच्या दिवशी ६ अपक्ष उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला आहे.

त्यामुळे आता एकूण १६ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागल्यापासून अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. या अनेक घडामोडींमुळे ही निवडणूक रंगतदार ठरणार असून नाशिकचे पदवीधर यंदा कोणाला कौल देणार, यात कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघातून आज माघारीच्या शेवटच्या दिवशी तीन वाजेपर्यंत डॉ. सुधीर सुरेश तांबे, अमोल बाबासाहेब खाडे, हिंदुस्तान जनता पार्टीचे उमेदवार दादासाहेब पवार, धनंजय कृष्णा जाधव, राजेंद्र दौलत निकम, धनंजय विसपुते या सहा उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे तर नाशिक पदवीधर मतदार संघात आता १६ उमेदवार निवडणुकीच्या उभे आहेत. या निवडणुकीत पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीचे रतन बनसोडे आणि सत्यजित तांबे यांच्या सह अपक्ष शुभांगी पाटील यांच्यात खरी लढत होणार आहे पाटील यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळण्याची अपेक्षा आहे.

काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असूनही डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही आणि या निवडणुकीतून माघार घेतली. त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी या निवडणुकीसाठी अपक्ष अर्ज दाखल केला ऐनवेळी झालेला हा गेम पाहून संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. भाजपने आपला कोणताही उमेदवार या निवडणुकीसाठी उभा केलेला नाही , त्यांच्याकडून इच्छुक असलेल्यांना त्यांनी माघारी धाडले. हा सत्यजित तांबे यांना दिलेला छुपा पाठिंबाच आहे अशी चर्चा आहे.

त्यातूनच आता भाजपाचे धनंजय जाधव यांनी देखील या निवडणुकीतून माघार घेतली आहे. ते म्हणाले, राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन यांच्याशी बातचीत केल्यानंतर हा निर्णय घेतला.

भाजपचे धनंजय जाधव यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. पक्ष श्रेष्ठींच्या विनंतीनंतर मी माघार घेत असल्याचा जाधव यांनी खुलासा केला आहे. त्यामुळे यावरून लक्षात येते की भाजपही सत्यजित तांबे यांच्यासाठी रान मोकळे करत आहेत.

ML/KA/SL

16 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *