15 व्या केंद्रिय वित्त आयोगाचा एक हजार कोटींचा निधी प्राप्त
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क): १५ व्या केंद्रिय वित्त आयोगाच्या बंधित निधीच्या दुसऱ्या हफ्त्यापोटी ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना १ हजार ८३ कोटी ४९ लक्ष इतका निधी प्राप्त झाल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी दिली आहे.
राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या त्रिस्तरीय ग्रामीण स्वराज्य संस्थांना वित्तीय वर्ष सन 2022- 23 मधील बंधित (टाईड) ग्रान्टच्या दुसऱ्या हफ्त्यापोटी केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या वतीने बंधित (टाईड) ग्रान्टच्या हफ्त्यापोटी राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना हा निधी प्राप्त झाला आहे. सदर निधीतून राज्यातील ग्रामीण भागातील मुलभुत सोयी- सुविधांबाबत विकास कामांना गती मिळणार असून, आतापर्यंत सन 2022- 23 या आर्थिक वर्षात राज्याला एकूण रू.3 हजार ६२६ कोटी एवढा निधी प्राप्त झाला आहे.1000 Crore Fund received from 15th Central Finance Commission
राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या त्रिस्तरीय ग्रामीण स्वराज्य संस्थांमधील विकास कामे पूर्णत्वास येण्यासाठी मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती मंत्री महाजन यांनी दिली आहे.
राज्यातील ग्रामीण भागातील स्वच्छता आणि हागणदारी मुक्त स्थानिक स्वराज्य संस्थेंची देखभाल व दुरूस्ती याचबरोबर पेयजल पाणी पुरवठा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वॉटर रिसायकलिंग आदि महत्वपुर्ण कामे या माध्यमातून पुर्ण केली जाणार आहेत, अशी माहिती यांनी यावेळी दिली.
केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या वतीने सदरचा निधी राज्याला मिळावा, यासाठी वेळोवेळी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी सातत्याने पाठपुरावा करून महत्वपूर्ण प्रयत्न केले.
सदर प्रयत्नांमुळे राज्याला भरघोस निधी प्राप्त होण्यास मदत झाली असून तो तात्काळ वितरित करण्यात येणार असल्याची माहिती यांनी यावेळी दिली.
ML/KA/PGB
6 Apr. 2023