पाळधी गावात 144 कलम लागू, दगडफेकीच्या घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता

 पाळधी गावात 144 कलम लागू, दगडफेकीच्या घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता

जळगाव, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी गावात नमाज सुरू असताना मंगळवारी रात्री मशिदीबाहेर संगीत वाजवण्यावरून दोन गटात हाणामारी झाली असून दोन गटात तुफान दगडफेक झाली होती.

याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील तब्बल शंभरहून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर ५६ संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून त्यातील १६ जणांना आज न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

पाळधी गावात मंगळवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास एका धार्मिक स्थळाजवळून काही जण जात असताना अचानक दगडफेक झाली. त्यात पोलिसासह तीन जण जखमी झाले. हल्लेखोरांनी तीन वाहनांचे तसेच काही दुकानांची तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील १०० हून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी ५६ संशयित आरोपींना अटक केली होती. त्यातील १६ जणांना आज न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तर उर्वरित जणांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

या घटनेनंतर 144 कलम लागू करण्यात आली असून तूर्तास गावात तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान राज्य राखीव दलासह पोलिसांच्या तुकड्या गावात तैनात करण्यात आल्या असून कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी केले आहे.

ML/KA/SL

30 March 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *