पंतप्रधानांच्या
कार्यालयात चंद्रपूरमधील सागवान लाकडाचे फर्निचर
चंद्रपूर दि ७ :–चंद्रपूर जिल्ह्याच्या शिरपेचात पुन्हा एक मानाचा तुरा खोवला गेलाय. भारताच्या पंतप्रधानांच्या पूर्ण कार्यालयात चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान लाकडाचे फर्निचर तयार केले जाणार आहे. यासाठी बल्लारपूर येथील वनविभागाच्या डेपोतून दिल्लीला 3018 घन फूट लाकूड जाणार आहे. 8 सप्टेंबर ला संध्याकाळी 5 वाजता हे लाकूड दिल्लीला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत बल्लारपूर येथून रवाना होणार आहे.
PMO मधील पंतप्रधान यांचं स्वतःचं ऑफिस, पंतप्रधान बसतात ती खुर्ची-टेबल, कॉन्फरन्स रूम, Bilateral room, Multi purpose हॉल, कॅबिनेट मीटिंग हॉल, प्रिंसिपल सेक्रेटरी ऑफिस यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान वापरले जाणार आहे. या आधी सेंट्रल विस्टा, अयोध्येतील श्री राममंदिर आणि दिल्लीतल्या भारत मंडपम येथे चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान लाकूड वापरण्यात आले आहे.