कष्टाळूपणाची वृत्ती जोपासल्यास महाराष्टातील तरुण-तरुणींना अमेरिकेची दारे नेहमीच उघडी

 कष्टाळूपणाची वृत्ती जोपासल्यास महाराष्टातील तरुण-तरुणींना अमेरिकेची दारे नेहमीच उघडी

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अमेरिका हा देश हुशार व कुशल व्यक्तींना संधी देणारा देश आहे. जागतीकरणाच्या लाटेत पूर्वीपेक्षा आता अमेरिकेत नोकरीच्या खूप संधी निर्माण झालेल्या आहेत. महाराष्ट्रातील युवकांना अमेरिका व कॅनडा या देशात नोकरीच्या खूप संधी असून योग्य ते नियोजन व कष्टाळूपणाची वृत्ती जोपासल्यास महाराष्टातील तरुण व तरुणींना अमेरिकेची दारे नेहमीच उघडी आहेत. त्याचा लाभ या तरुणाईने घेतला पाहिजे असे प्रतिपादन अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या माजी अध्यक्ष श्रीमती विद्या जोशी यांनी केले.
मुंबई मराठी पत्रकार संघात जागतिक व्यासपीठावर मराठी युवक युवतींना असलेल्या संधी या चर्चासत्रात त्या बोलत होत्या . यावेळी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी प्रास्ताविक केले .

अमेरिकेत व कॅनडा येथे मोठ्या प्रमाणात भारतीय राहतात . पूर्वी गेलेल्या भारतीयांनी तेथे मोठ्या प्रमाणात कंपन्या स्थापन केल्या आहेत , व या कंपन्यात भरती करताना ते भारतीय व विशेतः मराठी मुलांना पसंती देतात . मात्र आपल्या येथील युवकांना तेथपर्यंत पोहोचणे कठीण जाते , कधी कधी त्यांची फसवणूक ही होते हे टाळण्याकरता तरुणांनी अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाचा लाभ घ्यावा असे आवाहन ही जोशी यांनी केले .
अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळ तेथे कोणकोणते उपक्रम राबवत असते व त्याचे कोणते लाभ नवतरुणांनी घेतले पाहिजे हे त्यांनी यावेळी स्पष्ट केले .
सध्या अमेरिकेत आय टी डाटा ऍनालिसिस व हेल्थकेयर इन्फॉर्मेटिक या क्षेत्रात खूप मागणी आहे , मराठी तरुणांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले .अमेरिकेत जाण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही तर योग्य त्या औपचारिकता पूर्ण करून गेल्यास अमेरिकेची दारे आपणास नेहमीच उघडी असतात असेही त्यांनी स्पष्ट केले .यावेळी विद्या जोशी यांनी उपस्तिथ असलेल्याच्या प्रश्नाची उत्तरे दिली . यावेळी श्रीमती विद्या जॊशी यांचे आभार मराठी पत्रकार संघाच्या उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर यांनी मानले . youth of Maharashtra

महाराष्ट्र व अमेरिकेचे जवळचे नाते असूनही आज महाराष्टातून अमेरिकेत जाण्यासाठी विमानाची थेट कनेक्टिव्हिटी खूप कमी आहे . नुकतेच मुंबई ते सॅन फ्रान्सिको दरम्यान थेट विमानसेवा सुरु झाली , तर नेवार्क साठी सेवा पूर्वी पासून सुरु आहे . मुंबई शिकागो व इतर ठिकाणी जाण्यासाठी आज हि महाराष्टातील लोंकाना दिल्लीला जावे लागते , हे टाळण्यासाठी आपण महाराष्ट सरकार व केंद्र सरकारकडे कडे पाठपुरावा करणार असल्याचे जोशी यांनी सांगितले .

ML/KA/PGB
17 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *