गडकरींच्या धमकी प्रकरणात तरुणी !
नागपूर, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयात धमकीचे फोन केल्या प्रकरणी एका मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी तसेच 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
कर्नाटक राज्यातील मंगळुरू (Mangalore) पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आता नागपूर पोलीस या मुलीला ताब्यात घेण्यासाठी कर्नाटकच्या दिशेने रवाना झाले आहेत.
मागील अडीच महिन्यात सलग दुसऱ्यांदा गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने नागपूरसह महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणेची झोप उडाली आहे. मंगळवारी नागपूरमधील ऑरेंज सिटी जवळील गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात तीन वेळा कॉल आले. तसेच 10 कोटी रुपयांची खंडणीही मागण्यात आली. कॉल करणाऱ्याने स्वतःचं नाव जयेश पुजारी सांगितलं होतं.
SL/KA/SL
22 March 2023