सिंधुदुर्ग जिल्ह्यात यलो आणि ऑरेंज अलर्ट

 सिंधुदुर्ग जिल्ह्यात यलो आणि ऑरेंज अलर्ट

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात 7 ते 8 जून 2024 रोजी यलो अलर्ट तर 9 ते 11 जून 2024 रोजी ऑरेंज अलर्ट असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने कळविले आहे.

जिल्ह्यात दि. 7 आणि 8 जून 2024 या कालावधीत गडगडाट होवून पाऊस पडण्याची तसेच वीजा चमकण्याची शक्यता आहे. तसेच 7 जून रोजी 50 ते 60 किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच 9 ते 11 जून या कालावधीत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.

दरम्यान मच्छीमारांनी मच्छीमारी बंदीचा कटाक्षाने अंमल करावा , कोणत्याही प्रकारच्या नौका घेऊन समुद्रात जाऊ नये , असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

ML/ML/PGB
7 Jun 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *