श्री अंबाबाईची सप्तमातृका शक्तितील पूजा

 श्री अंबाबाईची सप्तमातृका शक्तितील पूजा

कोल्हापूर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात शारदीय नवरात्रौत्सवात करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईची सप्तमातृकाशक्ती श्रीदेवी मातेच्या रूपातील पूजा बांधण्यात आली आहे.

विश्वातील वेगवेगळ्या शक्ती या एका आदिशक्तीची विविध रूपं आहेत, हे दर्शवणारी सप्तमातृका शक्ती श्रीदेवी मातेची पूजा बांधण्यात आली आहे. Worship of Shri Ambabai in Sapta Matruka Shakti
यात श्रीदेवी सिंहावर बसली असून तिच्या हातात गदा, ढाल, म्हाळुंग आणि पात्र आहे. देवीच्या भोवती ब्राह्मणी देवी, माहेश्वरी देवी, कौमादी देवी, वैष्णवी देवी, इंद्राणी देवी, वाराही देवी, चामुंडा देवी यांच्या प्रतिमा आकर्षकरीत्या मांडण्यात आलेल्या आहेत .

ML/KA/PGB
22 Oct 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *